रेल्वेरुळ आणि पूल उडवण्याचा दहशतवाद्यांचा काय होता प्लॅन - Saam Tv
देश विदेश

रेल्वेरुळ आणि पूल उडवण्याचा दहशतवाद्यांचा काय होता प्लॅन? काय मिळालं ट्रेनिंग?

दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीनंतर मोठी आणि धक्कादायक माहिती हाती येते आहे. देशातल्या महत्त्वाच्या रेल्वेचे मार्ग, प्रमुख पूल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते

सूरज सावंत

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या Delhi Police हाती लागलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीनंतर मोठी आणि धक्कादायक माहिती हाती येते आहे. देशातल्या महत्त्वाच्या रेल्वेचे मार्ग, प्रमुख पूल दहशतवाद्यांच्या Terrorists निशाण्यावर होते. नवरात्रीच्या Navaratri दिवसांत घातपाताचा कट तडीस नेण्यासाठी अडीच किलो आरडीएक्सचा RDX बंदोबस्त करण्यात आला होता. काय होता नक्की हा प्लॅन....

भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यातील दोघांना पाकिस्तानच्या Pakistan इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आयएसआय ISI या गुप्तचर संस्थेने प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती दिल्ली स्पेशल पोलिसांतर्फे देण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी त्यांना आरडीएक्स भरलेली आयइडी स्फोटके, हातबॉम्ब, पिस्तुले, काडतुसे स्लीपर सेल कडून मिळाल्याचे दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही सामग्री उत्तर प्रदेशातून पाठवण्यात येणार होती. जान महंमद शेख व मूलचंद यांना पाकिस्तानमधील अनिस इब्राहिमने Anees Ibrahim यासाठी हवालामार्फत पैसेही पाठवले होते.

या सहा मधील दोन आरोपींना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार ते दोघ इतर आरोपींना मार्गदर्शन करणार होते. पाकिस्तानात या दोघांना गेस्ट हाऊसमध्ये एके 47 चालवणे- उघडणे, चायना पिस्तुल हाताळणे, आईडी लावणे, रेकी दरम्यान कुणाला संशय आल्यास कशी परिस्थिती हाताळावी, छोट्या हत्यारांनी कसा हल्ला करावा, गर्दीच्या ठिकाणी कोणी पाळत ठेवल्यास काय करावे याचे मार्गदर्शन मिळाले होते. ह सर्वजण वेळीच हाती सापडले नाहीतर काय याची कल्पनाच करवत नाही.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT