मुंबईची 'लाईफलाईन' पुन्हा धोक्याच्या उंबरठ्यावर?

मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दहशतवाद्यांचे सावट पुन्हा घोंगावू लागले आहे
मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दहशतवाद्यांचे सावट पुन्हा घोंगावू लागले आहे
मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दहशतवाद्यांचे सावट पुन्हा घोंगावू लागले आहे- Saam Tv
Published On

मुंबई : मुंबईची Mumbai लाईफ लाईन Life LIne म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दहशतवाद्यांचे सावट पुन्हा घोंगावू लागले आहे. दिल्ली Delhi स्पेशल सेलने पकडलेल्या ६ दहशतवाद्यांच्या Terrorists चौकशीतून मुंबईची लाइन लाइन ओळखल्या जाणाऱ्या लोकलला Mumbai Local Train दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लक्ष ठरवल्याचे समोर आले आहे. Mumbai Local Train under threat again

1993 च्या साखळी बाँम्ब स्फोटातही Bomb Blasts अशाच प्रकारे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. याची झळ आजही या स्फोटात जखमी झालेल्यांना सोसावी लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोकल दहशत वाद्यांच्या हिट लिस्टवर असल्याचे समोर आल्याने तपास यंत्रणा कामाला लागल्याचे पहायला मिळत आहे.

दिल्लीत पकडण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांच्या चौकशीत हे आरोपी उत्तर प्रदेश, देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत घातपात करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र हीच तीन राज्य त्यांनी का निवडली, असा प्रश्न आहे. मात्र या मागचं उत्तर असं आहे की, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचे वारेवाहु लागले आहेत. याच राज्याची दिल्लीतीलं केंद्र सरकार सत्ता स्थापनेत मोठी मदत होते. तर मुंबईकडे सर्वांचे लक्ष असल्यानेच या तीन राज्यांची निवड या दहशतवाद्यांनी केली असण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून वर्ततवली जात आहे. Mumbai Local Train under threat again

मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर दहशतवाद्यांचे सावट पुन्हा घोंगावू लागले आहे
Manoj Patil | मनोज पाटीलच्या आत्महत्या प्रयत्नाच्या प्रकरणी साहिल खान संशयाच्या भोवऱ्यात

शहरात लाखो नागरिक दररोज रेल्वेने प्रवास करतात. त्या तुलनेत रेल्वेची सुरक्षा अत्यंत तोकडी आहे. या पूर्वीही रेल्वेत साखळी बाॅम्बस्फोट होऊनसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना झालेली नाही. याच गोष्टीचा फायदा उचलत कोणतंही हत्यार किंवा स्फोटकांचा वापर न करता रेल्वे रूळ कमकुवत करून दुर्घटना घडवण्याचा दहशत वाद्यांचा कट असल्याची माहिती समोर आली होती.

उन्हात लोखंड गरम होऊन ते किंचीत प्रसरण पावतं, तर हिवाळ्यात ते आकुंचन पावत असल्यानं रेल्वे रूळ एकमेकांना जोडताना त्यात इंचभर जागा सोडली जाते. याच इंचभर जागेत सिमेंट किंवा दगड टाकल्यास रूळ वाकडे होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. घातपाताची ही नवी पद्धत दहशतवाद्यांनी शोधून काढल्याचे एटीएसने अटक केलेल्या एका दहशतवाद्याच्या चौकशीतूनपुढे आले होते. Mumbai Local Train under threat again

नेमका असाच कट दहशतवादी घडवणार होते की, की प्लॅन बी नुसार जुनीच पद्धत म्हणजे स्फोटकं लावून घातपात करणार होते, याबाबत सहा जणांकडे चौकशी सुरू आहे. मात्र या आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पहायला हवे, कारण रेल्वे रुळांवर कोणतीही गस्त नसते. त्यामुळे रूळाखाली स्फोटकांचा वापर करून स्फोट घडवू शकतात. त्यामुळेच कालच्या घटनेनंतर रेल्वे पोलिस आयुुक्त कैसर खालीद यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सर्वांना अॅलर्ट राहण्यास सांगितले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com