What Is PM-PVTG Saam Tv
देश विदेश

PM-PVTG काय आहे? ज्यावर मोदी सरकार 2400 कोटी रुपये खर्च करणार; विधानसभा निवडणुकांवर होणार परिणाम?

PM-PVTG काय आहे? ज्यावर मोदी सरकार 2400 कोटी रुपये खर्च करणार; विधानसभा निवडणुकांवर होणार परिणाम?

Satish Kengar

PM-PVTG in Marathi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिनानिमित्त PM PVTG (विशेषत: असुरक्षित आदिवासी गट) विकास अभियान सुरू करणार आहेत. PM PVTG ही आदिवासी गटांच्या विकासासाठी एक योजना असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आदिवासी समाजातील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असंही सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अभियानात मोदी सरकार 24,000 कोटी रुपयांची योजना सुरू करणार आहे. हे अभियान 9 मंत्रालयांमार्फत राबविण्यात येणार आहे, उदाहरणार्थ PMGSY, PMGAY, जल जीवन मिशन इत्यादी अंतर्गत आदिवासी लोकांचा समावेश केला जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अर्थसंकल्पात करण्यात आली होती घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली होती. ही योजना आदिवासी गटांच्या (PVTG) सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्याबद्दल असल्याचं बोललं जात आहे. प्रधानमंत्री पीव्हीटीजी विकास मिशनच्या माध्यमातून लाखो लोकांना मदत मिळणार आहे. (Latest Marathi News)

18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आदिवासी गटांमध्ये अशा 75 जमाती आहेत. 220 जिल्ह्यांतील 22,544 गावांमधील या पीव्हीटीची लोकसंख्या अंदाजे 28 लाख आहे.

वीज, घर, शुद्ध पिण्याचे पाणी

या जमाती अनेकदा जंगलातील दुर्गम वस्त्यांमध्ये राहतात. आशा PVTG कुटुंबांना आणि वसाहतींना रस्ते, कनेक्टिव्हिटी, वीज, घरे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छता देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे, असं सांगितलं जात आहे.

यासोबतच यामुळे शिक्षण, आरोग्य, पोषण आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील. दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या दोन दिवसांत यासाठी मतदानही होणार आहे. या पाचही राज्यात मोठ्या संख्येने आदिवासी समाज आहे. ही योजना लॉन्च झाल्यानंतर याचा परिणाम निवडणुकांवरही दिसू शकतो, असं राजकीय तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

SCROLL FOR NEXT