New Bharat Series SaamTv
देश विदेश

New Bharat Series : परराज्यात पोलीस नाहीत अडवणार वाहने, काय आहे नवीन BH Series?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (MoRTH) काल शुक्रवारी (२६ ऑगस्ट ) भारत मालिका BH Series वाहनांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत नवीन बीएच सीरीज वाहनांना नोंदणीच्या कोणत्याही हस्तांतरणाची आवश्यकता नसून सदर वाहने देशभरात प्रवास करू शकतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतातील वाहनधारकांसाठी आता एक आनंदाची व मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने आता देशभरातील वाहनांसाठी नवीन रजिस्ट्रेशन मार्क अथवा चिन्ह सुरु केले आहे. त्यामुळे विविध कारणांनी कामास्तव अथवा इतर कारणांसाठी राज्य बदलावे लागत असणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्य बदलल्यानंतर वाहन नोंदणीचा त्रास वाचणार देखील वाचणार आहे.

काय आहे हि नवीन Bharat series ?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (MoRTH) काल शुक्रवारी (२६ ऑगस्ट ) भारत मालिका BH Series वाहनांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत नवीन बीएच सीरीज वाहनांना नोंदणीच्या कोणत्याही हस्तांतरणाची आवश्यकता नसून सदर वाहने देशभरात प्रवास करू शकतील. हि नवीन सुविधा राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण कर्मचारी तसेच खाजगी कंपन्या ज्यांची कार्यालये ४ पेक्षा जास्त राज्यात आहेत अश्या कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक अथवा पर्यायी आधारावर उपलब्ध असेल.

हे देखील पहा -

जाणून घ्या 'तो' नियम :

ज्यावेळी आपण नोकरी अथवा व्यवसायानिमित्त अथवा इतर कारणास्तव दुसऱ्या राज्यात राहायला जातो. तेव्हा मोटार वाहन अधिनियम, 1988 कलम 47 नुसार कोणत्याही वाहनमालकाला त्याचे वाहन परराज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवण्यास परवानगी नाही. एक वर्षाच्या आता त्या राज्यातील राज्य प्राधिकरणाकडे आपल्या वाहनाची पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.

त्यामुळे या नवीन भारत सिरीज चा फायदा जुन्या वाहनांना होणार नसला तरी नवीन वाहने घेणाऱ्या नागरिकांना होणार आहे.

कसा असणार नवीन नंबर :

BH नोंदणीचे स्वरूप YY BH 4144 XX YY असे ठेवण्यात आले असून, यातील YY म्हणजे प्रथम नोंदणी असे आहे. समजा २०२१ या वर्षातील गाडी असेल तर नंबर 21BH5555MH असा असू शकतो.

By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT