Atishi Marlena Saam Tv
देश विदेश

Atishi Marlena : ३ बँकांमध्ये खाती, ५७ लाखांची एफडी; दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांची संपत्ती किती?

What Is Net Worth Of Atishi Marlena : आप नेत्या आतिशी मार्लेना या दिल्लीच्या नवी मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांची एकूण संपती किती आहे, ते आपण जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? हा सस्पेन्स मागील दोन दिवसांपासून होता. अखेर आता हा सस्पेन्स संपलाय. आम आदमी पक्षाच्या विद्यमान शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना ह्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील, अशी माहिती मिळतेय. पक्षाच्या बैठकीत आतिशी मार्लेना यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याकडे एकूण किती संपत्ती, ते आपण जाणून घेऊ या.

दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री

आतिशी मार्लेना यांनी २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं की, त्यांच्याकडे सुमारे १ कोटी ४१ लाख रुपयांची संपत्ती (Net Worth Of Atishi Marlena) आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये आतिशी यांची तीन खाती आहेत. या खात्यांमध्ये आतिशी यांच्या नावावर सुमारे १ लाख ३८ हजार रुपये जमा आहेत.एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये ३९ लाख आणि १८ लाख रुपयांच्या दोन एफडी आहेत.

आतिशी मार्लेना यांची संपत्ती किती?

आतिशी मार्लेना यांच्या पतीच्या नावावर देखील आयसीआयसीआय बँकेत खाते असून त्यामध्ये आठ लाख रुपये ( Atishi Marlena Assets) आहेत. त्यांच्याकडे सुमारे ५४ लाख रुपयांची एफडी आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर गाडी, बंगला असं काहीच नाहीये. मालमत्तेच्या घोषणेमध्ये आतिशी मार्लेना यांनी ५ लाख रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी असल्याचा देखील खुलासा (What Is Net Worth Of Atishi Marlena) केलाय. आतिशी यांच्या पतीचे सुमारे १३ लाख रुपयांचे पीपीएफ खाते, साडेचार लाख रुपयांची पोस्टल एफडी आणि २७ हजार रुपयांची बचत आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू

आतिशी मार्लेना सध्या दिल्लीच्या शिक्षण मंत्री आहेत. आतिशी यांचा अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू नेत्यांमध्ये समावेश होतोय. कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना (New Chief Minister Of Delhi) आतिषी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची घोषणा होताच, आतिशी यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होतं. त्याला आज आप पक्षाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलीय. अरविंद केजरीवाल संध्याकाळी साडेचार वाजता पदाचा राजीनामा देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT