Delhi Next CM: ना अरविंद केजरीवाल, ना सिसोदिया; राजधानी दिल्लीची सत्ता कोणाकडे? मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नावांची चर्चा

Who Will Next CM After Arvind Kejriwal: मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या या या निर्णयानंतर आता दिल्लीच्या राजकारणात मोठी उपलापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण? याबाबत चर्चा सुरु झाली असून अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत.
Delhi Next CM: ना अरविंद केजरीवाल, ना सिसोदिया; राजधानी दिल्लीची सत्ता कोणाकडे? मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नावांची चर्चा
Who Will Next CM After Arvind Kejriwal: Saamtv
Published On

दिल्ली, ता. १५ सप्टेंबर

Who Will Next CM Of Delhi: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे. कथित मद्यघोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामिन मंजूर केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन पायउतार होणार असून जनतेने कौल दिल्याशिवाय मुख्यमंत्रीपदी होणार नाही, अशी घोषणा केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या या या निर्णयानंतर आता दिल्लीच्या राजकारणात मोठी उपलापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण? याबाबत चर्चा सुरु झाली असून अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत.

Delhi Next CM: ना अरविंद केजरीवाल, ना सिसोदिया; राजधानी दिल्लीची सत्ता कोणाकडे? मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नावांची चर्चा
Maharashtra Politics : मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, नितीन गडकरींचा रोख कोणाकडे? पाहा VIDEO

केजरीवाल देणार राजीनामा...

तिहाड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून मी राजीनामा देत आहे. मी परीक्षेला तयार आहे, तसेच मनीष सिसोदिया हेही मुख्यमंत्री होणार नाहीत, प्रामाणिक असेल तर मतदान करा, नाहीतर मतदान करू नका असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेची चावी कोणत्या आप नेत्याच्या हातात दिली जाणार? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

कोण होणार पुढील मुख्यमंत्री?

अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यानंतर दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावाची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात मोठ्या दावेदार मानल्या जात आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सर्वात विश्वासू नेत्यांमध्ये आतिशी यांची गणना केली जाते. केजरीवाल यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. मनीष सिसोदिया दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात तुरुंगात गेल्यावर त्यांच्या जागी आतिशी यांना शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच दिल्लीचा अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला.

Delhi Next CM: ना अरविंद केजरीवाल, ना सिसोदिया; राजधानी दिल्लीची सत्ता कोणाकडे? मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नावांची चर्चा
Pune Crime: पुण्यात चाललंय काय? पुन्हा गोळीबाराची घटना, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

या नावांची चर्चा...

आतिशी मर्लेना व्यतिरिक्त सौरभ भारद्वाज हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ते आम आदमी पक्षाचे अनेक वर्षांपासूनचे सदस्य असून दिल्ली विधानसभेत ग्रेटर कैलास मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सध्या सौरभ हे दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, शहरी विकास आणि पर्यटन मंत्री आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील आहेत आणि पक्ष संकटात असतानाही, ते बेधडकपणे पक्षाची भूमिक मांडतात करतात. याआधी सौरभ दिल्ली जल बोर्डाचे अध्यक्षही होते. त्यांच्या संयमी वागणुकीमुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाच्या बड्या दावेदारांमध्ये गणना केली जात आहे.

कैलाश गेहलोत यांच्याकडे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले तिसरे मोठे नाव आहे. ते दिल्लीचे परिवहन आणि पर्यावरण मंत्री आहेत. ते नवी दिल्लीच्या नजफगढ विधानसभा जागेचे प्रतिनिधित्व करतात. कैलाश गेहलोत हे लो प्रोफाइल नेते असून ते क्वचितच चर्चेत असतात. सध्या त्यांच्याकडे वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, महसूल, कायदा, न्याय व विधी कार्य, महिला व बालविकास आणि माहिती व तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांनी नजफगढ मतदारसंघातून दिल्ली विधानसभेची पहिली निवडणूक जिंकली.

Delhi Next CM: ना अरविंद केजरीवाल, ना सिसोदिया; राजधानी दिल्लीची सत्ता कोणाकडे? मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नावांची चर्चा
Accident News : देवदर्शनासाठी निघाले, पण वाटेतच काळाची झडप; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com