WEST BENGAL VIOLENCE: TMC LEADER SAHADEV BAG FOUND DEAD IN HOOGHLY, BJP ACCUSED Saam Tv
देश विदेश

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये खुनी सत्र सुरु, मुख्यमंत्र्यांच्या PA नंतर TMC नेत्याची हत्या

West Bengal TMC Leader Murder Case News : पश्चिम बंगालमध्ये TMC नेते सहदेव बाग यांचा मृतदेह हुगळी जिल्ह्यात आढळून आला आहे. या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पश्चिम बंगालमध्ये TMC नेते सहदेव बाग यांचा मृतदेह नाल्यात आढळला

  • सहदेव बाग हे गेल्या एक दिवसापासून बेपत्ता होते

  • त्यांच्या पत्नीने भाजपवर धमक्या आणि हत्येचे गंभीर आरोप केले आहेत

  • पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवून तपास सुरू केला आहे

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांनंतर पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराच्या घटनांनी डोके वर काढले आहे. पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येची बातमी ताजी असतानाच आता TMC च्या नेत्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सहदेव बाग (Sahdev Bag Murder Case) असे मृत नेत्याचे नाव असून हुगळी जिल्ह्यातील गोघाट परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नकुंडा पंचायत अंतर्गत येणाऱ्या कोटा गावात तृणमूल काँग्रेसचे नेते सहदेव बाग यांचा मृतदेह एका पक्ष कार्यालयाजवळील नाल्यात आढळून आला. त्यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या आहेत. सहदेव बाग हे बेपत्ता होते. रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांना त्यांचा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

सहदेव बाग हे स्थानिक पंचायत सदस्य चीनाबाग यांचे पती होते. त्यांच्या पत्नीने या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सहदेव यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या, असा दावा त्यांनी केला. शनिवारी रात्री सहदेव घरातून बाहेर गेले होते, मात्र ते परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह तृणमूल काँग्रेस कार्यालयाच्या मागच्या बाजूला आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून स्थानिकांची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीनंतरही हिंसाचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील खेजुरी भागातही शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत, भाजप समर्थकांनी ६० हून अधिक दुकाने जाळल्याचा आरोप केला आहे. राज्यातील वाढत्या हिंसाचारामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार; भाजप सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Pratap Sarnaik: अखेर पालीकरांचे स्वप्न पूर्ण! अत्याधुनिक बसस्थानक उभारणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT