Arpita Nandy TT Player Saam Digital
देश विदेश

Arpita Nandy TT Player : छातीतलं दुखणं तिने शेवटपर्यंत झेललं सामना जिंकला अन्... , टेबल टेनीसपटू अर्पिताची मनाला चटका लावणारी 'एक्झीट'

Arpita Nandy Table Tennis Player : टेबल टेनीसपटू अर्पिता नंदीने सामना जिंकला इच्छापूर ऑर्डनन्स फॅक्टरी येथे डीजीक्यूए आंतर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी जिंकली, मात्र सामना जिंकल्याचा आनंदही तिला साजरा करता आला नाही.

Sandeep Gawade

Arpita Nandy TT Player

पश्चिम बंगालमधून संपूर्ण क्रीडा विश्वाला धक्का देणारी घटना घडली आहे. टेबल टेनीसपटू अर्पिता नंदीने सामना जिंकला इच्छापूर ऑर्डनन्स फॅक्टरी येथे डीजीक्यूए आंतर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी जिंकली, मात्र सामना जिंकल्याचा आनंदही तिला साजरा करता आला नाही. अंतिम सामना जिंकल्यानंतर अर्पिता काही मिनिटातच मैदानावर कोसळली आणि यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा विश्व हादरून गेलं आहे.

प्राथमिक उपचारानंतर तिला कामरहाटी येथील सगोर दत्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आलं. तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचा डॉक्टरांचा संशय आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. बागुआटी येथील रहिवासी अर्पिता कानपूरचे प्रतिनिधित्व करत होती, जिथे तिची नियुक्ती झाली होती. तिचा मोठा भाऊ अनिर्बन नंदी हा भारताचा माजी खेळाडू आता प्रशिक्षक आहे. "मी पूर्णपणे शॉकमध्ये आहे. मी अधिक काही बोलू शकत नाही," अशा भावना अनिर्बनने व्यक्त केल्या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑर्डनन्स बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सामन्यादरम्यान अर्पिताला छातीत दुखत होते आणि सुरुवातीला दुसरं काहीतरी कारण असावं असं वाटल्यामुळे दुर्लक्ष करण्यात आलं. पण सामन्यानंतर तिला त्रासाची लक्षणे दिसू लागली आणि ती अचानक कोसळली. प्राथमिक उपचारानंतर तिला तातडीने कामरहाटीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थिचे प्रयत्न केले मात्र तिला वाचवता आलं नाही.

भारतीय टेबल टेनिसची सध्याची स्टार खेळाडू यहिका मुखर्जी म्हणाली की, ही बातमी अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. अर्पिता माझ्यापेक्षा वरिष्ठ होती आणि तिच्यासोबत कधी खेळण्याचा योग आला नाही. पण अनिर्बन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळण्याचा योग आला. हा खरोखरच दुःखाचा दिवस आहे," असं त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

SCROLL FOR NEXT