West Bengal Accident Saam Tv
देश विदेश

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक; ९ जणांचा जागीच मृत्यू

West Bengal Accident: पश्चिम बंगालमध्ये ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण लग्न समारंभावरून घरी परत जात होते.

Priya More

पश्चिम बंगालमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात पहाटे हा भीषण अपघात झाला. पुरूलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग- १८ वर भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण लग्न समारंभ आटपून घरी परत जात होते. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरुलिया-जमशेदपूर टाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १८ वर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. बलरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नामसोल प्राथमिक शाळेजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. कारमधील ९ जण पुरुलियाहून झारखंडकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कारने बरमपूरहून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांना स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ९ जखमींना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कारमधील सर्वजण लग्न समारंभातून परतत होते. अपघातग्रस्त कार पुरुलियाहून बलरामपूरला जात होती. त्याचवेळी कार अनियंत्रित झाली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला तिने धडक दिली. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक देखील अनियंत्रित झाला आणि जवळच्या भातशेतीत जाऊन उलटला. अपघाताची माहिती मिळताच बलरामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना पोलिसांनी रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये असणारे सर्वजण पुरुलियाच्या बाराबाजार पोलिस स्टेशन हद्दीतील अदाबाना गावातून झारखंडच्या निमडीह पोलिस स्टेशन हद्दीतील तिलैतान या गावात जात होते. हे सर्वजण बोलेरोमधून प्रवास करत होते. ही गाडी अचानक अनियंत्रित झाली आणि तिने भरधाव ट्रकला धडक झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की गाडीचा चुराडा झाला. पोलिसांनी गाडीतून मृतदेह बाहेर काढणं देखील कठीण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT