Tragic accident Saam Tv News
देश विदेश

तीर्थयात्रेला जाताना भीषण अपघात; भरधाव बसची ट्रॅक्टरला धडक, १० प्रवाशांचा जागीच मृत्यू

Tragic Bus Accident: पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवानमध्ये भीषण बस-ट्रॅक्टर अपघात. १० जणांचा मृत्यू, ३५ जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर. सर्व प्रवासी बिहारचे तीर्थयात्री, दुर्गापूरच्या दिशेने प्रवास.

Bhagyashree Kamble

  • पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवानमध्ये भीषण बस-ट्रॅक्टर अपघात

  • १० जणांचा मृत्यू, ३५ जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर

  • सर्व प्रवासी बिहारचे तीर्थयात्री, दुर्गापूरच्या दिशेने प्रवास

  • पोलिस, स्थानिक आणि बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू

स्वातंत्र्यदिनी पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग १९ वर नाला फेरी घाटाजवळ भरधाव खासगी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये ५ लहान मुलेही प्रवास करीत होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. सर्व प्रवासी बिहारचे रहिवासी असून, तीर्थयात्रेसाठी निघाले होते. दुर्गापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्याला सुरूवात केली.

३५ प्रवासी जखमींना बर्दवान मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगानं जात होती. दरम्यान, चालकाला पार्क केलेला ट्रॅक्टर दिसला नव्हता. त्यामुळे बस ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोरात आदळली.

टक्कर इतकी भीषण होती की, बसचा पुढचा भाग चेंदामेंदा झाला. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अपघात घडल्यानंतर अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. सध्या पोलीस, स्थानिक आणि बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 31 व्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर भलंमोठं मधमाश्यांचं पोळं; रहिवाश्यांनी केला व्हिडीओ शेअर

मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Revati Lele Wedding: प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; पुण्यातील राहत्या घरी झाला ग्रहमख विधी; PHOTO पाहा

Amol Kolhe: विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, रोहित पवारांचा दावा कितपत खरा?, कोल्हे म्हणाले...

Accident News : टिटवळ्यात विचित्र अपघात! भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना दिली धडक

SCROLL FOR NEXT