पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर परिसरातील शिराखोल येथे ही घटना घडली होती.
या प्रकरणात टीएमसी नेते इम्रान हसन मोल्ला यांना अटक
पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन तपास केला.
भाजप नेते जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना १० डिसेंबर २०२० रोजी घडली होती. पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर परिसरातील शिराखोल येथे, टोळक्यानं भारतीय जनता पक्षाचे नेते जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर अचानक हल्ला केला होता. जे. पी. नड्डा हे त्यावळे भाजपचे राष्ट्रीय अध्य्क्ष होते.
या हल्ल्यादरम्यान, वाहनांची मोठी तोडफोड झाली होती. वाहनांवर विटा, दगड आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. सुदैवाने ताफ्यातील कोणत्या नेत्याला गंभीर इजा झाली नव्हती. दरम्यान दीर्घकाळपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या एका प्रमुख नेत्याला, इम्रान हसन मुल्ला याला अटक केलीय.
गेल्या शनिवारी रात्री उस्ती परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेत. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी घटनेच्या धागेदोरे जोडल्यानंतर हल्ल्यावेळी काय घडलं असेल हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी घटनेनंच नाट्य रुपांतर केलं होतं. यात आरोपी इमरान हसन मोल्लाहला उस्ती पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या परिसरातील रस्त्यावरून फिरवलं.
ताफ्यावर हल्ला करणारा आरोपी हा टीएमसी नेता आहे. पोलिसांनी आरोपी नेत्याला धिंड काढण्यासाठी रस्त्यावर आणलं तेव्हा तिथे स्थानिक रहिवाशांची मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी इमरान हसन मुल्ला घाबरलेला आणि अस्वस्थ दिसत होता. काही वेळा तो स्थानिकांसमोर हात जोडून उभा राहिला, तर काही वेळा त्याने आपल्या कृत्याबद्दल माफी मागतील. पोलिसांच्या या कृतीमागचा उद्देश परिसरात कायद्याची भीती निर्माण करणे आणि तपास प्रक्रियेचा कोणताही पैलू अपूर्ण राहू नये याची खात्री करणे हा होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.