Mamata Banerjee’s Nandigram Candidate Withdraws Nomination saamtv
देश विदेश

West Bengal Politics: ममता बॅनर्जींना २४ तासांत दुसरा धक्का! उमेदवारानं ऐनवेळी निवडणुकीतून घेतली माघार

Nandigram Bypoll : नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या गटाच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी उमेदवारी मागे घेतली. माघारीपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतली होती.

Bharat Jadhav

  • नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी उमेदवारी मागे घेतली.

  • उमेदवारी माघारीपूर्वी संचिता प्रधान डे यांनी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची नबन्ना येथे भेट घेतली.

  • माघारीनंतर ममता गटाकडे नंदीग्राममध्ये स्वतःचा उमेदवार राहिलेला नाही.

पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या २४ तासात ममता यांना हा दुसरा धक्का बसलाय. याआधी निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवलं होतं. आता पक्षाच्या उमेदवार असलेल्या संचिता प्रधान डे यांनीच अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे.

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या भेटीनंतर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडलीय. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झालीय. नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने संचिता प्रधान डे यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पश्चिम बंगालमधील राजकारणाने नवे वळण घेतलंय. दरम्यान नंदिग्राम जागेची पोटनिवडणूक ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आता उमेदवारच नाही

नंदीग्राम जागेसाठीची पोटनिवडणूक ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ऐनवेळी उमेदवाराने माघार घेतल्यानंतर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. संचिता प्रधान डे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे 'ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस'कडे सध्या नंदीग्राम पोटनिवडणुकीसाठी कोणताही उमेदवार उरलेला नाहीये.

टीएमसीच्या दोन गटांमधील वाद काय?

तृणमूल काँग्रेसमध्ये संघटना आणि पक्षाचे चिन्ह यावरून ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये संघर्ष सुरू होता. दोन्ही बाजूंनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर आपला दावा सांगितला होता. या संघर्षावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिलाय. शुक्रवारी निवडणूक आयोगाने या दोन गटांना स्वतंत्र नावे आणि निवडणूक चिन्हे दिली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या गटाला 'ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि 'फुटबॉलपटू' हे चिन्ह देण्यात आले, तर रिताब्रता बॅनर्जी यांच्या गटाला 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि 'लिफाफा' हे चिन्ह देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalya Miriche Fayade: काळी मिरीची चिमूटभर पूड 'या' ६ पदार्थांसोबत खा, चमत्कार पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

अग्निवीर सैनिकांनीसाठी 4 वर्ष पूर्ण होण्याच आत मिळणार नोकरी; कुठे मिळणार संधी?

Weekly Horoscope: पुढचा आठवडा ५ राशींसाठी ठरणार गेमचेंजर, तर काहींवर येणार मोठं संकट; वाचा तुमचं राशिभविष्य

Ratnagiri Village : कोकणातील 'हे' गाव पावसाळ्यात स्वर्ग दिसतं, जपलाय ४०० वर्षांचा वारसा

SCROLL FOR NEXT