West Bengal Politics: Bjp Rejects Alliance With Rebel Tmc Mp Group saam tv
देश विदेश

बंडखोर खासदारांच्या गटाला भाजपचा 'दे धक्का'; राजकीय वर्तुळात खळबळ

West Begal Politics : भाजपने एनसीपीआय (NCPI) सोबत युती करून निवडणूक लढवली, तर ती दुर्दैवी बाब ठरेल. अशा परिस्थितीत, टीएमसीमधील भ्रष्ट नेते ज्यांच्याविरोधात आम्ही वर्षानुवर्षे लढा दिला आहे.ते भाजपच्या पाठिंब्याने निवडून येतील, असं भाजप नेत्यांमध्ये चर्चा आहे.

Bharat Jadhav

  • बंडखोर टीएमसी खासदारांच्या गटाला भाजपकडून मोठा राजकीय धक्का

  • कोलकाता महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या शक्यतेला भाजपने नकार दिला.

  • पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा

पश्चिम बंगालमध्ये पु्न्हा एकदा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे. टीएमसीमधून बंडखोरी करून एनडीएसोबत जाणऱ्या खासदारांच्या ग्रुपला भाजपनं मोठा दणका दिलाय. भाजपनं बंडखोर खासदारांसोबत युती करण्यास नकार दिलाय. सायोनी घोष, काकोली घोष दस्तीदार आणि सुदीप बंडोपाध्याय यांच्यासह २० खासदारांचा समावेश असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटासोबत युती करून कोलकाता महानगरपालिका (KMC) निवडणूक लढवण्यास भारतीय जनता पक्षाने (BJP) स्पष्ट शब्दात नकार दिलाय.

दरम्यान हा बंडखोर खासदारांचा गट 'एनसीपीआय' (NCPI) मध्ये सामील झालाय. त्यावेळी खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष (एनसीपीआय) भाजपसोबत मिळून KMC निवडणूक लढवेल. मात्र, त्यांच्या या विधानाच्या अगदी उलट भूमिका घेत भाजपने अशी युती करण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. सुदीप बंडोपाध्याय बुधवारी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष आगामी कोलकाता महानगरपालिका (KMC) निवडणुका एनडीएचा (NDA) घटक म्हणून लढवेल.

"आम्ही एनडीएचा पक्ष म्हणून निवडणुका लढवू आणि आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे, ज्यांनी याला दुजोरा दिलाय''
खासदार सुदीप बंडोपाध्याय

मित्रपक्षांसोबत निवडणुका लढण्याबाबत कोणतीही चर्चा नाही

न्यू टाउन येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मजुमदार म्हणाले, "आमच्या प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वीच स्पष्ट केले की, राज्यात भाजपचा कोणताही मित्रपक्ष नाही. बंगालमधील विधानसभा निवडणुका आम्ही कोणत्याही मित्रपक्षाशिवाय लढलो. आम्ही एकट्याने लढलो आणि अनेक जागा जिंकल्या. त्यामुळे, केएमसी निवडणुका कोणाशी युती करून लढण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मलाही असा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाहीये.

दरम्यान बंडोपाध्याय यांच्या प्रतिक्रियेनंतर मजूमदार म्हणाले की, त्यांना याबाबत कोणतीच माहिती नाही. तसेच या मुद्द्यावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य किंवा सुवेंदू अधिकारीच बोलू शकतात. भाजपमधील सूत्रांच्या मते, एनसीपीआय सोबत युती करून केएमसी (KMC) निवडणूक लढवणे हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. कारण एनसीपीआयचे सर्व खासदार मे महिन्यापर्यंत तृणमूल काँग्रेससोबत होते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी राजकीय घडामोड; अडीच वर्षानंतर मुंबई महापालिकेवर शिंदेसेनेचा महापौर बसणार?

Maharashtra News Live Update: बारामतीत राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी

मुंबईच्या पावसात CSMTचं सौंदर्य अनुभवणं म्हणजे वेगळीच मजा! फिरा 'हे' पिकनिक स्पॉट्स

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला चुकूनही 'या' रंगांचे कपडे घालू नका! नाहीतर.....

कॅबिनेट मंत्र्यांना स्वाइन फ्लूची लागण! प्रकृतीची विचारपूस करण्यास आलेल्या आरोग्यमंत्र्यांनाच रोखलं

SCROLL FOR NEXT