Political circles abuzz as reports of a possible merger between a major regional party and Congress trigger fresh debate over opposition unity. Saam tv
देश विदेश

भाजपचं टेन्शन वाढणार, २८ खासदार असलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

West Bengal Politics : काँग्रेसनं टीएमसीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. या वृत्तामुळे एका मोठ्या राजकीय घडामोडीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

  • 28 खासदार असलेल्या एका मोठ्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांना वेग.

  • या संभाव्य घडामोडीमुळे भाजपसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता.

  • पश्चिम बंगालमधील राजकीय हालचालींमुळे चर्चांना अधिक महत्त्व.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. एक-एक करत अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जींच्या पक्षाला रामराम ठोकला आहे. देशातील राजकारणातील एक मोठी बातमी हाती आली आहे, त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. देशातील एका मोठ्या पक्षानं टीएमसीला विलीनीकरणाची ऑफर दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉग्रेस पक्षावर खूप बिकट परिस्थिती झाली आहे. आमदारांनी वेगळा गट तयार केल्यानंतर आता खासदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे राज्यसभा खासदारांनी अस्वस्थता निर्माण झाल्यानं काही खासदार आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत, अशात ममता बॅनर्जी यांना काँग्रेसनं पक्ष विलीन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव स्वत: सोनिया गांधी यांनीच फोन करून दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तृणमूल काँग्रेसचे एकूण २८ खासदार आहेत. यातील जवळपास २० खासदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. ते काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्याविरूद्ध नाराजी आहे. एक-एक टीएमसी नेते ममतांची साथ सोडून बंडखोर गटाकडे जात आहेत. त्यामुळं ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना मोठी ऑफर देखील दिलीय. यामुळे भाजपच्या राजकीय हल्ल्यापासून वाचण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची विनंती सोनिया गांधी यांनी केल्याचं म्हटलं जातंय.

दिल्लीतील पक्षासारखी होणार परिस्थिती

तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला नाही तर तृणमूलचीही 'आम आदमी पक्षासारखी अवस्था होईल, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे. सोनिया गांधी यांनी ममता आणि अभिषेक यांना काँग्रेस पक्षात मोठं पद देण्याची देखील ऑफर दिल्याचं सांगण्यात येत आहे. सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्याची तसेच अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव पदाची ऑफर दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी या ऑफरबाबत विचार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरूच

School Close : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी, रेड अलर्टमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

SCROLL FOR NEXT