West Bengal repoll vidhan sabha elections saam tv
देश विदेश

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतदानाला सुरूवात, 15 बुथवर का होतेय फेरमतदान ?

West Bengal election revoting : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर १५ बूथवर फेरमतदान सुरू झाले आहे.

Namdeo Kumbhar

Revoting at 15 booths in West Bengal Vidhan sabha election : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी १५ बूथवर फेरमतदानाला सुरूवात झाली आहे. या १५ बूथवर मतदानादरम्यान गैरप्रकाराच्या तक्रारी आल्याने निवडणूक आयोगाने फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. मगराहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 बूथवर तर डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 बूथवर पुन्हा मतदान सुरू झाले आहे. why revoting is happening in West Bengal elections

विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १५ ठिकाणी गैरप्रकार, अनियमितता झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली. त्यामुळेच या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिघाड अथवा मुद्दाम ते बंद ठेवल्याचा आरोप आहे. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM) छेडछाड झाल्याच्या संशयापर्यंतचे आरोप आहेत. सूत्रांनुसार, काही EVM वरील पक्षांची चिन्हे टेपने झाकलेली होती. त्यामुळे मतदारांच्या पसंतीवर परिणाम होण्याची शक्यता होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्याला अवकाळी पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; पुढील काही दिवस महत्त्वाचे

Ahilyanagar Tourism : कोकण कड्याची भव्यता अन् सह्याद्रीतील थरार; करा 'या' ऐतिहासिक किल्ल्याचा रोमांचक प्रवास

HSC Result 2026 Today : बारावीचा निकाल आज! संकेतस्थळाची अधिकृत यादी एका क्लिकवर, वाचा सविस्तर

Cancer Risk Unmarried: लग्न न केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो? संशोधनातून धक्कादायक सत्य समोर

Monalisa : "मला १० वेळा स्पर्श केला"; 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT