Mamata Banerjee news  saam tv
देश विदेश

Mamata banerjee injured : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत, कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु

Mamata banerjee Latest News : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बाबत मोठी बातमी हाती आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

mamata banerjee injured :

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बाबत मोठी बातमी हाती आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना घडली आहे. टीएमसीने एक्स हँडलवरून याबाबत ही माहिती दिली आहे. (Latest marathi News)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जखमी अवस्थेमधील काही फोटो समोर आले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे. बॅनर्जी यांना कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालाय उपचार सुरु आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घरात ट्रेड मिलवर व्यायाम करताना पडल्या. यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. ममता बॅनर्जी या याआधी देखील दुखापतग्रस्त झाल्या होत्या.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा अपघात झाला होता. बर्धमानहून कोलकाताला परतत असताना धुक्यामुळे कार अपघात झाला.

सूत्रांच्या माहितीनुसार, पावसाळ्यात ममता बॅनर्जी या कारने परतत होत्या. कारमध्ये असताना ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यातील एका कारने अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या कारच्या ड्रायव्हरलाही ब्रेक मारावा लागला. त्यानंतर झालेल्या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना २०२१ मध्येही त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर अनेक उपचार सुरु होते. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण होतं. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातील प्रचारादरम्यान दुखापतग्रस्त झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

SCROLL FOR NEXT