Mamata Banerjee on Narendra Modi Oath  Saam TV
देश विदेश

Mamata Banerjee : सरकारं कधीकधी एक दिवस पण टिकतात; मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जी यांचं मोठं विधान

Mamata Banerjee on Narendra Modi Oath : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठं विधान केलं आहे. सरकारं कधीकधी एक दिवस पण टिकतात, असं ममता यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. मात्र, त्यांना बहुतमाचा आकडा गाठता आला नाही. दुसरीकडे भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) २९३ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. आज सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

त्यांच्या शपथविधीआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं विधान केलं आहे. सरकारं कधीकधी एक दिवस पण टिकतात. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. कमकुवत आणि स्थिर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला सत्तेतून बाहेर काढल्यास आनंद होईल, असं ममता यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न पत्रकारांनी ममता यांना विचारला. तेव्हा, आपण शपथविधीला जाणार नसल्याचं ममता यांनी स्पष्ट केलं.

'एनडीए' सरकार फार काळ टिकणार नाही, असा मोठा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. आज देशाला बदल हवा आहे. हा जनाधार परिवर्तनासाठी होता. त्यांना सरकार स्थापन करू द्या, आम्ही वाट पाहतोय. 'इंडिया' आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. याचा अर्थ भविष्यात आम्ही तसे करणार नाही, असंही ममता म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी CAA वरून भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "CAA रद्द करावा लागेल. ही मागणी आम्ही संसदेत मांडणार आहोत. मला माफ करा, पण मी असंवैधानिक, बेकायदेशीर पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा देऊ शकत नाही. माझ्या शुभेच्छा देशासाठी असतील, मी सर्व खासदारांना सांगेन की, पक्ष मजबूत करा".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT