Damaged motorcycle after a high-speed Audi car crashed into a family distributing wedding invitations in Rewa, Madhya Pradesh. Saam Tv
देश विदेश

लग्नाची पत्रिका द्यायला निघालेल्या बाप–लेकाला भरधाव कारची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, लग्न घरावर दु:खाचा डोंगर

Wedding Celebration Turns Tragedy Road Accident: लग्नाची पत्रिका देण्यासाठी निघालेल्या बाप-लेकाला भरधाव ऑडी कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Omkar Sonawane

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात भरधाव ऑडी कारच्या धडकेत भीषण अपघात झाला असून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रायपूर कर्चुलियान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोष्टा गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडला. लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वारांना समोरून येणाऱ्या वेगवान ऑडी कारने जोरदार धडक दिली. या अपघातात वडील, मुलगा आणि एक त्यांचा नातवाईक असे तिघेही ठार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घरातील आनंदाचा क्षण काहीवेळात दु:खात बदलला.

लग्नाचा आनंद ठरला दुःखाचा कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकांची ओळख चचाई (जिल्हा रीवा) येथील भागवत विश्वकर्मा, त्यांचा लहान मुलगा राहुल विश्वकर्मा आणि एका नातेवाईक म्हणून झाली आहे. भागवत विश्वकर्मा यांच्या मोठ्या मुलाचे लग्न २४ फेब्रुवारी रोजी ठरले होते. याच पार्श्वभूमीवर भागवत आपल्या लहान मुलासह नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी निघाले होते. जिउला मोड परिसरात एका नातेवाईकाला कार्ड दिल्यानंतर ते पुढे जात असताना रायपूर कर्चुलियानच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ऑडी कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक देताच गाडीचे तुकडे तुकडे

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले आणि तिघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिघांनाही रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मृतांच्या घरातल्यांनी एकच टाहो फोडला असून लग्नाची तयारी अंत्यविधीमध्ये बदलली आहे.

ऑडी कार चालक ताब्यात, तपास सुरू

अपघातानंतर ऑडी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाहन जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा अपघात गाडी जोरात चालवल्याने झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentines Day Wife Gifts : बायकोला द्या मंगळसुत्राच्या या डिझाईन्सच्या भेट वस्तू, व्हेलेंटाईन होईल खास

Maharashtra Live News Update: पंढरपुरात रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहतूक करणार्या एका टिपरला आग

Mumbai Accident: कारवर पोलिसाची नेमप्लेट, चालक दारुच्या नशेत बेभान; भरधाव वेगात वाहनांना धडाधड उडवलं!

Noida News : निर्माणाधीन इमारतीत मोठी दुर्घटना; दोन कामगारांचा मृत्यू

Jalgaon Tourism: जळगावपासून 284 किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन; या विकेंडला नक्की प्लान करा

SCROLL FOR NEXT