Weather Updates Saam TV
देश विदेश

Weather Updates : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस, या राज्यांना अलर्ट

देशात थंडीचा कडाडा वाढला असतानाच काही राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Weather Updates : देशात थंडीचा कडाडा वाढला असतानाच काही राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे. येत्या ४८ तासांत देशातील काही राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Weather Updates) पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानाचे स्वरूप बदलत आहे. एकीकडे दिल्लीतील जनता थंडीची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेच्या किनारपट्टीवरील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील ४८ तासांत ते तामिळनाडू-पुडुचेरी किनारपट्टीच्या दिशेने उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तामिळनाडू-पुद्दुचेरी-कराईकल येथे ११ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस (Rain Alert) पडू शकतो. त्याचवेळी, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर खूप जोरदार वारे वाहण्याची अंदाज आहे.

हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, अंदमान आणि निकोबार बेटांवर एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचवेळी दक्षिण कर्नाटक किनारपट्टी कर्नाटक आणि रायलसीमा येथेही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय डोंगराळ राज्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टी होईल.

दिल्लीतही पावसाचा अंदाज

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत सुद्धा आज म्हणजेच ११ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. यानंतर दिल्लीत धुके पाहायला मिळतील आणि थंटीची लाट येईल असं सांगण्यात आलं आहे. वातावरणाबरोबर त्याचबरोबर दिल्लीच्या प्रदूषणाच्या पातळीतही सुधारणा झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT