Weather Update 9 December 2024 Saam TV
देश विदेश

IMD Weather Alert: महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये कोसळणार अतिमुसळधार पाऊस, वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

Rain Alert Marathi News: स्कायमेटच्या अंदाजानुसार, राजधानी दिल्लीसह एनसीआर, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि कराईकल या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Satish Daud

Weather Update 9 December 2024

देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाल्याने ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. अवकाळीमुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसाचं संकट कधी दूर होणार, याची वाट बळीराजा पाहत आहे. अशातच हवामान खात्याने अवकाळीबाबत मोठी अपडेट दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्कायमेटच्या अंदाजानुसार, राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये आज आणि उद्या हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि कराईकल या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज (Rain Alert) हवामान संस्थेने वर्तवला आहे.

तर ८ ते १० जानेवारी दरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये तुरळक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात ८ ते १० जानेवारी या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज आहे.  (Latest Marathi News)

दुसरीकडे तामिळनाडूच्या काही भागात आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस सुरू राहू शकतो. पुढील २४ तासांत केरळम, कर्नाटक, कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा

सोमवारी रात्रीच्या सुमारास महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. सिंधुदुर्गातील काही भागात गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात या अवकाळी पावसाने हजेरी लावली. पालघर जिल्ह्यातील सफाळे, मनोर , कुडुस भागातही सोमवारी रात्री पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT