Rainfall Update Saam Tv
देश विदेश

Weather Update: पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, ७ राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार

Rain Alert For 7 States: आज ७ राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Priya More

देशात सध्या थंडी, ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे. देशातील काही राज्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. काही ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. तर काही ठिकाणी उष्णता वाढली आहे. आजही देशातील अनेक राज्यांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ७ राज्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. याठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केरळ, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी ५० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील हवामानात सतत बदल होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गारठा कमी आणि उकाड्यात वाढ होऊ शकते. अक्वान' चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली. राज्यात थंडी कमी झाली असून दुपारच्या वेळी उकाडा वाढला आहे. आज राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकण परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

राज्यात ढगाळ हवामान झाल्याने किमान तापमानात घट झाली आहे. तर उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. काल धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उर्वरित राज्याच्या किमान तापमान १५ अंशांच्या वर गेले आहे. किमान तापमानासह कमाल तापमानात देखील वाढ होत असून, काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वरच आहे. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल

निवडणुकीआधी विरोधी पक्षाचा मोठा डाव! उमेदवारांची यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी, कुणाचा पत्ता कट?

आइस्क्रीमचं आमिष अन् ५ लाखांची खंडणी! १२ वर्षीय मुलासोबत काय घडलं?

Wednesday Horoscope: बुधवार ठरणार खास! या ५ राशींना मिळणार मोठी आनंदाची बातमी; महादेवाची विशेष कृपा

मळमळ, उलट्या, अतिसाराचा त्रास; शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू, महापालिकेकडून दुकानावर कारवाई

SCROLL FOR NEXT