हवामान खात्याने ईशान्येकडील राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे मणिपूरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे आणि मदत आणि बचाव कार्य तीव्र केलंय.
दरम्यान गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस झाला. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहील. १ जूनपर्यंत ईशान्येकडील राज्ये आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल. पुढील ३-४ दिवसांत वायव्य भारतात वादळ आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, केरळ आणि कर्नाटकमध्ये पुढील ४-५ दिवस पाऊस राहणार आहे. दक्षिण कर्नाटकात २ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यात ३ जूनपर्यंत मुसळधार पाऊस होईल. मणिपूरमध्येही सततच्या पावसामुळे गंभीर परिस्थिती झालीय. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीय.
माणिपूरमध्ये मागील ४८ तासात मुसळधार पाऊस होतोय. नद्यांमधील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. इम्फाळ नदीच्या किनाऱ्यावरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला सक्रिय करण्यात आले आहे, तर भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पाऊस सुरूच राहण्याचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी वादळ आणि पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी पर्यंत राहील. वादळाच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. १ आणि २ जून रोजी दिल्ली तसेच एनसीआर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.