Cyclone Akvan Alert: Andhra Pradesh And Odisha On High Alert | IMD Weather Update saam tv
देश विदेश

Weather Update: 'अकवान' चक्रीवादळाचं रौद्ररूप; 100 Kmph वेगाचं वादळ अन् ढगांचा गडगडाट, 'या' राज्यांमध्ये धो-धो कोसळणार पाऊस

Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, तीव्र चक्रीवादळ 'अकवान'ने बुधवारी आपला मार्ग बदललाय. याचा परिणाम म्हणून, बंगालमधील विविध जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • अक्वान चक्रीवादळाचा २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेश आणि ओडिशाला धोका

  • बंगालच्या उपसागरातील अक्वान चक्रीवादळाची ताजी स्थिती काय?

  • आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले 'अकवान' हे चक्रीवादळ १८ नोव्हेंबर रोजी अधिक तीव्र झालंय. त्याच दरम्यान या वादळाचा मार्गही बदललाय. तो आधी वर्तवलेल्या दिशेला न जाता आता उत्तर आणि ईशान्य दिशेकडे वळलाय. हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिननुसार, हे चक्रीवादळ २० नोव्हेंबर २०२६ च्या दुपारपर्यंत आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीच्या दरम्यान धडकण्याची दाट शक्यता आहे.

चक्रीवादळ जमिनीवर धडकतेवेळी वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटर इतका असू शकतो, तर वाऱ्याचे झोत ताशी ११० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटलं की, या चक्रीवादळामुळे उद्या, १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान पश्चिम बंगालच्या काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, याचा परिणाम म्हणून दक्षिण बंगालमधील काही जिल्ह्यांत पाहायला मिळू शकतो. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होऊ शकतो. पूर्व मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर दक्षिण २४ परगणा, हावडा, झारग्राम आणि बांकुरा जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोणत्या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या एका बुलेटिननुसार १९ आणि २० नोव्हेंबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि ओडिशामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडले असा अंदाज वर्तवण्यात आलाय. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानममध्ये १९ नोव्हेंबर रोजी वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी असू शकतो. ओडिशाच्या किनारपट्टीवर १९ नोव्हेंबरच्या सकाळपासून वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किमी (काही ठिकाणी ९० किमी प्रतितास वेगाचे झोत) असू शकतो.

पश्चिम बंगालध्ये तुफान वादळांची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्रीवादळ अकवाननं आपला मार्ग बदलला आहे. यामुळे १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण बंगालमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे.पूर्व भागातील मेदिनीपूर आणि पश्चिमी मेदिनीपूर मध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

तर दक्षिण २४ परगना, हावडा, झाडग्राम, आणि बांकुडा मध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. राज्याची राजधानी कोलकातामध्ये १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस होईल. तर ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.

किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा

१९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मच्छिमारांना बंगालच्या उपसागरात न जाण्याची सुचना देण्यात आलीय. हवामान विभागाने पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरील परिसरातील गावांना अलर्ट दिलाय. समु्द्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. वादळ जेव्हा किनारपट्टीवर धडकेल तेव्हा लाटा ०.५ ते १.२ मीटरपर्यत उसळतंय.

दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतात धुक्याची स्थिती

भारतीय हवामान विभागाने (IMD) वायव्य भारतातील थंडी आणि धुक्याबाबत इशारा दिला आहे. एका चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे विभागाने म्हटले आहे. १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये रात्रीच्या आणि सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठवाड्यात पाणीटंचाई की टँकरचा गोरखधंदा? कृत्रिम पाणीटंचाईनं टँकर माफिया मालामाल?

Gratuity : ५ वर्षांच्या आत नोकरी सोडली तरीही ग्रॅच्युइटी मिळेल, उच्च न्यायालयाच्या महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन वेतन नियम लागू; आठवड्यात किमान ४८ तास काम, सुट्टीच्या दिवशी काम केल्यास दुप्पट पगार

निषेधाच्या नादात फाडला बाळासाहेबांचा फोटो; ठाकरेसेनेचा मुंबई महापालिकेत निषेध मोर्चा

Maharashtra News Live Update: ऊसदराच्या मागणीसाठी सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT