cyclone remal update Saam TV
देश विदेश

Cyclone Remal : अतिभयंकर 'रेमल' चक्रीवादळ आज धडकणार, तुफान पाऊस कोसळणार; अनेक भागांना अलर्ट

cyclone remal update : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, रेमल हे चक्रीवादळ रविवारी रात्री उशिरा पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा किनारपट्टीवर धडकू शकते.

Satish Daud

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचे रुपांतर हे चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला 'रेमल' असे नाव देण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील खेपुपारा किनारपट्टीवर धडकू शकते.

परिणामी काही भागांत वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (२६ मे) पहाटे बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्यांचा ताशी वेग १०० ते १२० किमी प्रतितास असू शकतो, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

रेमल हे मान्सूनच्या आगमनानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ आहे. आयएमडीचे मते, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या चक्रीवादळ 'रेमाल'चे केंद्र खेपुपारा पासून सुमारे ३६० किमी दक्षिण-दक्षिणपूर्व आणि सागर बेटाच्या ३५० किमी दक्षिण-पूर्वेस आहे.

आयएमडीने सांगितले की, वादळाची तीव्रता आणखी तीव्र होऊन रविवारी सकाळपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. रविवारी मध्यरात्री सागर बेट आणि खेपुपारा दरम्यान पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.

यापार्श्वभूमीवर २६ ते २७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय २७-२८ मे रोजी ईशान्य भारतातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.

याशिवाय दक्षिण आणि उत्तर 24 परगणा सारख्या पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये २६-२७ मे साठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोलकाता, हावडा, नादिया आणि पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यांमध्ये 26-27 मे साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.

रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम?

रेमल या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही. पुढील २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढेल. तसेच काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असं भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वांगणी ग्रामीण रुग्णालयात बुरशी लागलेली औषधं, मनसेकडून कडक कारवाईची मागणी

Pune : ८०० स्टॉल, ५० लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी

गुड न्यूज! लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, ३१ व्या हफ्ताचे १५०० रुपये खात्यात जमा

School Holiday: महत्त्वाची बातमी! २७ डिसेंबरला सुट्टी जाहीर; शाळा-कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद

Mumbai Local Train : AC लोकलमधून प्रवास करताना तिकीट असूनही भरावा लागेल दंड; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT