Weather Report 16 November Saam TV
देश विदेश

Weather Updates: देशातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांनी घसरला, 11 राज्यांमध्ये पावसाचा इशारा

Weather Report 16 November: देशातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांनी घसरला, 11 राज्यांमध्ये पावसाचा इशारा

Satish Kengar

Weather Report 16 November:

देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात हळूहळू घट होत आहे. हवेत हलकीशी थंडी जाणवत आहे. तर काही राज्यांमध्ये अजूनही पावसाची स्थिती कायम आहे. मात्र महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरियाणाच्या हिस्सारमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या खाली आला आहे. त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर येथे या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पारा 10.9 अंशांवर घसरला आहे. तसेच उत्तर भारतातील मैदानी भागात थंड वारे वाहत आहेत. या भागात पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने, येथे प्रदूषण कमी होण्याची शक्यता कमी आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

स्कायमेट हवामान अहवालानुसार, पुढील 24 तासांत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  (Latest Marathi News)

याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवरही हलका पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने, केरळ, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि आसाममध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

गुरुवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब राहिली. दिल्ली सरकार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-कानपूर यांच्या संयुक्त प्रकल्पाच्या अलीकडील निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, बुधवारी दिल्लीच्या वायू प्रदूषणात वाहनांच्या उत्सर्जनामुळे सुमारे 38 टक्के योगदान होते. गुरुवारी हा आकडा 40 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT