Food Shortage In Indonesia Saam Digital
देश विदेश

Food Shortage In Indonesia: इंडोनेशियात अन्न धान्याचा तुटवडा; भारताशी आहे थेट संबंध

Prepares To Import From China: भारत सरकारने जुलैमध्ये निर्यात बंदी केल्यामुळे इंडोनेशिया चीनमधून आयात करण्याच्या तयारीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगातील तांदूळ उपभोक्ता देशांच्या यादीत इंडोनेशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, सध्या या देशात तांदळाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. भारत सरकारने जुलैमध्ये निर्यात बंदी केल्यामुळे आणि एल निनोच्या प्रभावामुळे इंडोनेशियात ही परिस्थिती उद्भवली आहे. इंडोनेशियन सरकारला तांदळाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीबरोबर त्याचं योग्य नियोजनही करणं कठीण बनलंय. फक्त ४० टक्के लोकांपर्यंतच सरकारी सहायता धान्य पोहोचत आहे.

साऊथ चाइन मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, इंडोनेशियन सरकारने तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयातीवरचे निर्बंध उठवले आहेत. सरकार चीनमधून २३ लाख टन तांदूळ आयात करण्याचा विचार करत आहे. मात्र तरीही तांदळाच्या तुटवड्यावरून संभ्रम निर्माण झाला असून तांदळाच्या आयातीला स्थानिक शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.

इंडोनेशियातील निरीक्षकांच्या मते, भारत सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे किमतींवर मोठा परिणाम झाला आहे. इंडोनेशियात साधारणता डिसेंबर आणि मार्चमध्ये तांदळाच्या किमती वाढतात. मात्र यावर्षी आतापासूनच तांदळाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी इंडोनेशियन सरकार चीन आणि थायलंड मधून तांदूळ आयात करण्याचा विचार करत आहे. मात्र सरकारला स्थानिक तांदूळ उत्पादकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.

इंडोनेशिया तिसरा मोठा तांदूळ उपभोक्ता देश

दक्षिण पूर्व आशियाई देश असलेला इंडोनेशिया तिसरा मोठा तांदूळ उपभोक्ता देश आहे. सरकारी आकडेवारीनुसार २७ कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात प्रत्येक व्यक्ती दरवर्षी ११४.६ तांदळाचा आहारात वापर करते. मात्र, यावर्षी आशियातल्या प्रमुख तांदूळ उत्पादक देशांमध्ये हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान एल निनोचा प्रभाव आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी इंडोनेशियाने २७ लाख टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडोनेशिया तांदूळ उत्पादनात ९० टक्के स्वावलंबी, तरीही....

संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटनेच्या आकडेवारीनुसार तांदूळ उत्पादन वाढविण्यात इंडोनेशिया २०१९ ते २०२१ या दरम्यान ९० टक्के स्वावलंबी बनला आहे. तरीही इंडोनेशियाने जानेवारी ते ऑगस्ट २०२३ पर्यंत १५९ लाख टन तांदूळ आयात केला आहे. यामधील निम्म्याहून अधिक तांदूळ थायलंड मधून आयात करण्यात आला. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही आयात सहा पट अधिक आहे आणि इंडोनेशिया सरकारच्या राष्टीय अन्न एजन्सीने, चीनमधून १० लाख टन तांदूळ आयात करणार असल्याचं २६ सप्टेंबरमध्ये म्हटलं आहे.

भारत तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार

भारत २०१२ पासून तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताने ४२ लाख अमेरिकेन डॉलर इतका तांदूळ निर्यात केला होता. त्याआधी २०२१-२२ मध्ये ३.३ दशलक्षचा तांदूळ निर्यात केला होता. मुख्यतः भारत, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश तांदूळ निर्यातीत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र मोदी सरकारने २० जुलै रोजी बासुमती वगळता सर्व प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. सण उत्सव काळात देशांतर्गत पुरवठा आणि वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT