Weather experts monitor the potential impact of the powerful ‘Godzilla El Niño’ phenomenon on India’s monsoon season. AI
देश विदेश

देशावर घोंघावतंय सर्वात मोठं संकट! 'गॉडझिला'मुळे धडकी भरली, पुढील ३ महिने अत्यंत महत्त्वाचे; नेमका काय दिला इशारा?

Godzilla El Niño Alert: ‘गॉडझिला अल निनो’बाबत जागतिक हवामान संघटनेने इशारा दिल्याने भारतातील मान्सून, शेती आणि जलसाठ्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Godzilla El Niño Update : भारतावर पुढील काही दिवसात एक मोठं नैसर्गिक संकट घोंघावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) 'गॉडझिला अल निनो'बाबत (Godzilla El Nino) अत्यंत भयंकर इशारा दिला आहे. या हवामान बदलामुळे संपूर्ण देशामध्ये पुढील ३ महिने तीव्र दुष्काळ किंवा महाभयंकर पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा खळबळजनक अंदाज वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते पुढील ३ महिन्यांत देशातील मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. पावसात तूट, तापमानात वाढ, जलसाठ्यांमध्ये घट आणि शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.

भारताची चिंता वाढली, पण....

जागतिक हवामान संघटनेच्या या इशाऱ्यामुळे देशाची चिंता वाढली असली, तरी भारतासाठी एक आशेचा किरणही आहे. 'आयओडी' (IOD - Indian Ocean Dipole) आणि 'एमजेओ' (MJO - Madden-Julian Oscillation) या दोन सागरी आणि हवामान प्रणाली सध्या सक्रिय आहेत. या दोन्ही प्रणाली भारताला या संभाव्य दुष्काळ आणि पूरसदृश परिस्थितीपासून वाचवू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत वादळी पाऊस; ९ जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'

एकीकडे जागतिक स्तरावर अल निनोचे संकट घोंघावत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे. राज्यामध्ये पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील एकूण ९ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ना शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT