Wayanad Landslide Saam Tv
देश विदेश

Wayanad Landslide: असं डोंगराएवढं दु:ख कुणाच्याही वाट्याला नको! मृतदेह तरी मिळू दे...कुटुंबीयांचे पाणावलेले डोळे घेताहेत शोध!

Wayanad Landslide Update: वायनाड दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या आपल्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. ढिगाऱ्याखालून आपला व्यक्ती जिवंत बाहेर येईल या आशेने ते त्याच ठिकाणी एकटक बघत बसले आहेत.

Priya More

केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही अनेक गावकरी बेपत्ता आहे. या दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या आपल्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. ढिगाऱ्याखालून आपला व्यक्ती जिवंत बाहेर येईल या आशेने ते त्याच ठिकाणी एकटक बघत बसले आहेत. घटनास्थळावर एनडीआरएफ, लष्कराचे जवानांकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पण मुसळधार पाऊस, खराब हवामानामुळे मदतकार्यामध्ये अडथळा येत आहे.

वायनाड भूस्खलनामध्ये ६८ वर्षीय शिवानंदन याचे कुटुंबीय बेपत्ता झाले आहेत. शिवानंदन आपला भाऊ शिवनसोबत याठिकाणी आले असून ते आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. त्यांची आई, दोन धाकटे भाऊ आणि त्यांचे कुटुंब भूस्खलनानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. चूरलमाला या गावामध्ये त्यांचे घर होते. पण भूस्खलनानंतर सहाही जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेची माहिती मिळताच शिवनंदन यांनी आपल्या गावाकडे धाव घेतली. आपले कुटुंबीय जिवंत सापडतील या आशेने ते मातीच्या ढिगाऱ्याकडे पाहत आहेत. पण आता घटना होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यांना फक्त त्यांचा धाकट्या भावाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. तर इतर सर्वजण अजूनही बेपत्ता आहेत. 'ते माझे रक्त आहेत. मला त्यांचे मृतदेह तरी मिळतील.', अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

वायनाडच्या मेपाडी सरकारी रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून शिवनंदन आणि त्यांचा भाऊ शिवन आपल्या कुटुंबातील सदस्यांना शोधत आहे. त्यांनी सर्व मृतदेह तपासले. पण त्यांना कोणीही सापडले नाही. शिवनंदन हे गुरूवारी घटनास्थळावर त्याचे घर होते त्याठिकाणी कुटुंबीयांना शोधण्यासाठी गेले. ते आपल्यासोबत काही मित्रांना घेऊन आले आहेत. त्यांचे मित्र देखील शिवनंदन यांच्या कुटुंबीयांना मातीच्या ढिगाऱ्याखाली शोधत आहेत. पण त्यांना देखील काहीच सापडले नाही.

मुसळधार पावसामध्ये घटनास्थळावर चिखल झाला आहे. माती भिजल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. मुसळधार पाऊस आणि पूराच्या पाण्यासोबत अनेक घरं वाहून देखील गेली आहेत. त्यामुळे मृतदेह शोधणे खूपच कठीण झाले आहे. भारतीय लष्कराचे जवान बेपत्ता झालेल्या गावकऱ्यांन शोधण्यासाठी चूरलमला ते मुंडक्काईपर्यंत १९० फूट लांबीचा पूल उभारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT