Watch Viral Video private buses collided Tamil Nadu SAAM TV
देश विदेश

दोन बस समोरासमोर धडकल्या; थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल

काळजाचा ठोका चुकवणारी भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

साम ब्युरो

चेन्नई: तामिळनाडूमधील सलेम जिल्ह्यातील भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बस एकमेकींना धडकल्या. या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अपघातग्रस्त बसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. हा अपघात मंगळवारी, १७ मे रोजी संध्याकाळी झाल्याचे समजते. एडप्पादीहून ३० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस तिरुचेंगोडे येथून येत होती. ती अन्य एका खासगी बसला जोरदार धडकली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये या भीषण अपघाताची घटना कैद झाली आहे. बसची धडक होताच चालक आपल्या सीटवरून फेकला गेल्याचे फुटेजमध्ये दिसते. बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाल्याचेही यात दिसते. या बस अपघातात ३० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवर भरधाव खासगी बस गेली. ती अन्य एका खासगी बसला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, बसमधील काही प्रवासी विंड स्क्रीनवर येऊन पडले. चालक मार्गिकेवरून आरामात बस नेत होता, त्याचवेळी समोरून आलेली एक बस विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवर येऊन जोरात धडकताना या फुटेजमध्ये दिसत आहे. या धडकेत चालक, वाहक आणि बसमधील प्रवासी विंड शीटवर आदळल्याचे दिसते. काचा फुटून त्या चालकाला लागल्याचेही या व्हिडिओत दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT