Watch viral video bihar former mla vinay singh/ Photo-Twitter Saam TV
देश विदेश

Viral News : फटाक्याची वात पेटवल्यानंतर माजी आमदार पळता पळता तोंडावर पडले, पाहा VIDEO

फटाक्याची वात पेटवून भीतीपोटी माजी आमदार पळता पळता मैदानातच तोंडावर पडले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Nandkumar Joshi

Viral News In Marathi : दिवाळी काही दिवसांवर आलीय. दिवाळीत फटाके फोडण्याची क्रेझ जबरदस्त आहे. पण काही जण फटाके फोडताना प्रचंड घाबरतात. फटाक्याची वात पेटवताना अनेक जण तीन-चार वेळा बिचकतात.

काही तर वात न पेटवताच पळू लागतात. असाच काहीसा प्रकार बिहारच्या माजी आमदारांसोबत घडला आहे. फटक्याची वात पेटवल्यानंतर माजी आमदार घाबरून पळू लागतात. माजी आमदार पळता पळता तोंडावरच जमिनीवर पडले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News)

बिहारच्या सोनपूर येथील माजी आमदार विनय सिंह एका फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. हा प्रकार ३ ऑक्टोबरला घडला आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ बघा.

माजी आमदार विनय सिंह हे फटाका पेटवायला गेले. त्यांच्या आजूबाजूलाही काही कार्यकर्ते उभे असतात. त्यातील एकाने भीतीपोटी आपल्या कानांवर हात ठेवला आहे. विनय सिंह फटाक्याची वात पेटवली. पण भीतीने ते मागच्या बाजूला पळू लागले. पळता पळता त्यांचा तोल गेला आणि मैदानातच ते तोंडावर आपटले. ते बघून आजूबाजूला असलेले कार्यकर्ते त्यांना उचलण्यासाठी धाव घेतात. दुसरीकडे फटाक्याचाही मोठा आवाज होतो.

दरम्यान, विनय सिंह हे बिहारचे भाजपचे दिग्गज नेते आहेत. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा पराभव केल्यानंतर ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. सध्या विनय सिंह हे बिहार भाजपच्या एका समितीचे अध्यक्ष आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakshee Gandhi: थोडीशी लाजली अन् गालातच हसली; अभिनेत्रीचं मोहक सौंदर्य

Shravan Special : श्रावणात चिकन-मटणाची चव येतेय? मग ही डुबुक वडी रेसिपी एकदा बनवाच

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT