Prime Minister Modi, Pragati Maidan, ITPO Tunnel, PM Modi Picks Up Litter At Pragati Maidan Tunnel
Prime Minister Modi, Pragati Maidan, ITPO Tunnel, PM Modi Picks Up Litter At Pragati Maidan Tunnel Saam Tv
देश विदेश

उदघाटनापुर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी बाेगद्यातील उचलला कचरा (व्हिडिओ पाहा)

Siddharth Latkar

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे स्वच्छतेस किती प्राधान्य देतात हे आज (रविवार) पुन्हा त्यांच्या कृतीतून अधाेरेखित झाले. दिल्लीतील (delhi) प्रगती मैदानावर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते बोगद्याचे उद्घाटन (pm modi inaugurated the tunnel at Pragati Maidan) झाले. त्यापुर्वी पंतप्रधान मोदींनी बोगद्याची पाहणी केली. त्यावेळी माेदींना तेथे कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या आढळल्या. माेदींनी काेणताही संकाेत न बाळगता स्वत: कचरा आणि प्लास्टिकची बाटली उचलली. त्यांनी परिसर स्वच्छ (clean) केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती म्हणजे ते स्वच्छतेला किती महत्त्व देतात याची सर्वांनाच कल्पना आली. (PM Modi picks up litter at newly launched ITPO tunnel in Delhi)

दरम्यान उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले प्रगती मैदान हे भारताची प्रगती, भारतीयांची ताकद, भारतीय उत्पादने, आपली संस्कृती दाखवण्यासाठी दशकांपूर्वी बांधण्यात आले होते, परंतु प्रगती मैदानाची प्रगती बराच काळ रखडली होती. त्याची योजना कागदावर दाखवली, पण आजपर्यंत काहीही केले गेले नाही.

अग्निपथ (Agneepath Scheme) वादाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हा आजचा नवा भारत आहे. भारताने हीच तडजोड केली आहे. नवीन काम करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकार देशाच्या राजधानीत जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि प्रदर्शन हॉल असावे यासाठी अथक प्रयत्न करत आहे असे माेदींनी त्यांच्या भाषणात नमूद केले.

मोदी म्हणाले दिल्लीत केंद्र सरकारचा भर आधुनिक पायाभूत सुविध देण्यांवर आहे. त्याचा थेट परिणाम आणि त्यामागचा उद्देश Ease of Living वर आहे. दिल्ली-एनसीआरच्या समस्या सोडवण्यासाठी गेल्या आठ वर्षांत अनेक महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. ते म्हणाले गेल्या आठ वर्षांत दिल्ली-एनसीआर मेट्रोचे सर्व्हिस सर्कल 193 किलोमीटरवरून 400 किलोमीटरपर्यंत वाढले आहे.

आज दिल्लीला केंद्र सरकारकडून आधुनिक पायाभूत सुविधांची भेट मिळाली आहे. इतक्या कमी वेळात कॉरिडॉर तयार करणे सोपे नव्हते. हा रस्ता दिल्लीतील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. दरम्यान सरकार देशाच्या राजधानीत जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि प्रदर्शन हॉल असावे यासाठी अथक प्रयत्न करत आहे असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT