PM Modi Australia Tour Saam Tv
देश विदेश

PM Modi Australia Tour: सिडनीमध्ये पीएम मोदींचे जंगी स्वागत, उंच आकाशात लिहिले 'Welcome Modi'

welcome modi written in the sky: पीएम मोदींच्या सीडीनीमधील या जंगी स्वागताची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

Priya More

Welcome PM Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) आहेत. आज मोदी ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये असून याठिकाणी त्यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे. सिडनीमध्ये दाखल झालेल्या पीएम मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. रिक्रियेश्नल एअरक्राफ्टच्या मदतीने मोदींच्या स्वागतासाठी आकाशात 'वेलकम मोदी' असे लिहिण्यात आले होते. पीएम मोदींच्या सीडीनीमधील या जंगी स्वागताची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून हा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा आहे. पंतप्रधान यापूर्वी पापुआ न्यू गिनीमध्ये गेले होते. जिथे आयलँड देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांच्या पायांना स्पर्श केले होते. तर जपानमधील हिरोशिमा येथे जी- 7 शिखर परिषदेत उपस्थिती लावलेल्या पीएम मोदी यांची ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गळाभेट करत ऑटोग्राफ मागितला होता. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेश दौरा चांगलाच चर्चेत आहे. या दौऱ्यातील खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ सतत समोर येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन सुपर सीईओ पॉल श्रोडर, फोर्टेस्क्यु फ्यूचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष अँड्र्यू फॉरेस्ट, हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या कार्यकारी अध्यक्षा जीना राइनहार्ट यांची भेट घेणार आहेत. यासोबतच पीएम मोदी ऑस्ट्रेलियातील काही प्रभावशाली लोकांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

पीएम नरेंद्र मोदी सिडनीतील कुडोस बँक एरिना स्टेडियममध्ये दाखल होणार आहेत. जिथे ते भारतीयांना संबोधित करणार आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या 20 हजार सीटर स्टेडियमची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. भारतीय ऑस्ट्रेलियन डायस्पोरा फाउंडेशनद्वारे मोदींच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांचे मोठ्या जल्लोषात आणि भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकांनी मोदी-मोदीचे नारे लगावले. मोदींची एक झलक पाहण्यासाठी लोक खूपच आतुर होते. पीएम मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. ज्यामध्ये समाजातील सामंजस्य आणि दोन्ही समाजांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तेजस्विनी पंडितने आईला दिला मुखाग्नी, अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; राज ठाकरेंची उपस्थित! VIDEO

Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

Viral Video: जुगाड असावा तर असा! महिलेने तुटलेल्या कॅसरोल बॉक्सचा केला अनोखा वापर, व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही

Election Commission: पुरावे मागितले तर उत्तर आलं नाही; राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान: निवडणूक आयोग

Maharashtra Politics : खान्देशात काँग्रेसला धक्का! प्रतिभा शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, VIDEO

SCROLL FOR NEXT