Tea Shop Saam TV
देश विदेश

Chai Tapri Viral Video : किळसवाण कृत्य! चहावाल्याने लघवीच्या कपात ओतला चहा; ग्राहकाने चहा पिताच...पाहा Video

Tea Shop : अशात अनेकांसाठी प्रिय असलेल्या या चहा संबंधी एक भयंकर प्रकार समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video : दिवसाची सुरुवात अनेक व्यक्ती एक कप चहाने करतात. चहाचा एक घोट घेताच अगदी फ्रेश वाटतं. अशात हा चहा घरी प्यायला मिळाला नाही तर अनेक व्यक्ती ऑफिसला निघताना बाहेर टपरीवर चहाचा घोट घेतात. कामात कंटाळा आणि आळस आल्यावर देखील व्यक्ती चहा पितात. अशात अनेकांसाठी प्रिय असलेल्या या चहा संबंधी एक भयंकर प्रकार समोर आला आहे. (Chai Tapri)

चहा विक्रेत्याचा व्हिडिओ आला समोर

सध्या सोशल मीडियावर चहा (Tea) विक्रेत्याचा एक अतिशय किळसवाणा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये या व्यक्तीने चहाच्या कपात लघवी केली. त्यानंतर तो कप त्याने थेट चहा देण्यासाठी वापरला. चहा पिण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने चहा मागितल्यावर त्याने लगेचच त्या कपातून सदर व्यक्तीला चहा दिला आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्यक्ती चहाच्या दुकानावर असताना त्याला लघवीसाठी जायचे होते. मात्र दुकान संभाळण्यासाठी तेथे कोणीही नसल्याने या व्यक्तीने थेट कप घेतला आणि त्यामध्ये लघवी केली. तसेच काही माध्यमांवर या घटनेविषयी असे म्हटले आहे की, चहा पिण्यासाठी व्यक्ती आला तेव्हा दुकानदाराकडे स्वच्छ कप नव्हते. हे कप साफ करण्यासाठी पाण्याची गरज होती. मात्र तिथे पाणीही नसल्याने या व्यक्तीने कपात लघवी केली. त्यानंतर लघवीनेच तो कप धुवून घेतला.

ही घटना नेमकी कुठली आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र @gieddeee या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मोठा संताप व्यक्त केला आहे. अशा कृत्यांमुळे कोणत्याही व्यक्तीच्या तब्येतीवर घातक परिणाम होऊ शकतो, असंही एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT