Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : डीजेच्या तालावर आजी 'तराट'!...; हातात बॉटल घेत केला भन्नाट डान्स, पाहा VIDEO

लग्नात किंवा अन्य मोठ्या सोहळ्यात आनंद व्यक्त करण्यासाठी बरेच जण नाचत आपल्याला झालेला आनंद व्यक्त करतात.

Ruchika Jadhav

Dance Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात की, जे पाहून नेटकरी पोट दुखेपर्यंत हासतात. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करत असतो. अशात लग्नात किंवा अन्य मोठ्या सोहळ्यात आनंद व्यक्त करण्यासाठी बरेच जण नाचत आपल्याला झालेला आनंद व्यक्त करतात. अशात सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. (Marathi News)

नाचताना दारूचे दोन घोट पोटात गेले की, नाचायला जोर येतो असं हळदीच्या डीजे नाईटवेळी अनेक व्यक्ती बोलत असतात. अशात आता व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या आजीनेही कहरच केला आहे. या आजीने हातात एक बॉटल घेत बॉलिवूडमधील 'बाहो में बोतल...' या गाण्यावर ठेका धरला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गावी एका समारंभात 'बाहो में बोतल...' हे गाणं लावलं आहे. गाणं सुरू होताच आजी जागची उठते आणि नाचायला सुरूवात करते. यावेळी गाण्याचा फील यावा म्हणून आजीने हातत एक प्लास्टीकची पाण्याची बॉटल घेतली आहे. आजीला पाहून खरोखर असं वाटत आहे की, या आजीबाईंनी मद्यप्राशण केले असावे.

आजीच्या भन्नाट डान्सचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगात पसरला असून सर्वत्र व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी आजीच्या डान्सचं कौतुक केलं आहे. तर काहींनी आजीच्या व्हिडिओवर (Video) हासण्याचे इमोजी पाठवले आहेत. एका युजरने आजी झिंगाट झाली आहे, अशी कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT