Viral Video Saam Tv
देश विदेश

Viral Video: तरुणांना चढला नवरात्रीचा फिवर, ''जय माता दी'' म्हणत दिल्ली मेट्रोमध्ये गायलं गाणं; व्हायरल VIDEO ची जोरदार चर्चा

Viral News: सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रोमधील अनोखा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओ तरुणांनी दिल्ली मेट्रोतच नवरात्री उत्सावाचे वातावरण निर्माण केलेले आहे.

Tanvi Pol

Delhi Metro Viral Video: भारतात अनेक सण उत्सव मोठ्या थाटामाटा साजरे करण्यात येतात. त्यातील सध्या नवरात्री उत्साह सध्या महाराष्ट्र नाही तर देशातील प्रत्येक शहरात-गावात साजरा केला जात आहे. नवरात्री उत्सवात प्रत्येकजण उत्साहाने सहभागी होत असतो. या उत्सवाची क्रेझ आता तरुणांनाही मोठ्या प्रमाणात झाली आहे. या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. ज्यात काही तरुणांनी दिल्ली मेट्रोत आई मातेचा उधो उधो करत गाणं गायलं आहे.

सोशल मीडियावर आपल्याला दरदिवशी दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ (Video)व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरतोच आणि मग त्यावर अनेक नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटत असतात. मात्र सध्या काही तरुणांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. नक्की काय घडलं दिल्ली मेट्रोत(Delhi Metro) ते तुम्ही पाहा.

नक्की आहे तरी काय व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येत आहे. या मेट्रोत अनेक प्रवाशी आहेत. यात काही महिला आहे तर काही लहान मुलं तर काही ठिकाणी वयोरुद्ध नागरिक दिसून येत आहेत. अशात दोन तरुण मेट्रोत दिसून येतात. त्यातील एका तरुणाकडे गिटार आहे तर दुसरा नवरात्री निमित्ताने गाणं गाताना दिसून येत आहे. तरुणांना पाहून काहीजण मोबाईमध्ये सर्व कैद करत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @arjun_bhowmick's या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून तो साधारण २ दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल व्हिडिओला हजारहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे.

कौतुकास्पद प्रतिक्रिया....

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''जय माता दी...,दिल्ली मेट्रोमध्ये जय माता दी'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांनी पंसती दिलेली असून अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''चला काही तरी वेगळ दिसलं'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,''हे दृश्य मला संपूर्ण अखंड भारतात पहायचे आहे, जय माता दी'' अशा अनेक प्रतिक्रिया यूजर्संनी दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT