viral video model beach accident Egypt  X/@Haberler
देश विदेश

मॉडेल समुद्राच्या किनार्‍यावर देत होती पोझ, अचानक लाट आली अन्... VIDEO व्हायरल

beach photoshoot : समुद्राच्या किनाऱ्यावर फोटोशूट करत असताना अचानक आलेल्या भल्यामोठ्या लाटेने मॉडेलला पाण्यात ओढून नेले. ही घटना इजिप्तमध्ये घडली असून मॉडेल जखमी झाली आहे.

Namdeo Kumbhar

viral video model beach accident Egypt : समुद्राच्या किनार्‍यावर मॉडेल फोटोशूट करत होती. त्याच वेळी अचानक भलीमोठी लाट आली अन् मॉडेलला घेऊन पाण्यात घेऊन गेली. या दुर्घटनेत मॉडेल वाचली, पण गंभीर दुखापत झाली आहे. मॉडेलला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मॉडेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

समुद्राच्या लाटेत वाहून गेलेल्या मॉडेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ खूपच भयानक आहे. कारण मॉडेल फोटोशूटसाठी पोज देत होती. त्याचवेळी अचानक लाट आली अन् महिला वाहून गेली. हा व्हिडओ इजिप्तमधील असल्याचे न्यूयॉर्क पोस्टमध्ये सांगितलेय. चीनमधील मॉडेल इजिप्तमध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी समुद्राच्या किनाऱ्यावर ती पोझ देत होती. त्याचवेळी भलीमोठी लाट आली अन् मॉडेलला धडकली. या दुर्घटनेत ती वाचली, पण तिला दुखापत झाली आहे.

न्यूज एक्सच्या रिपोर्ट्सनुसार, चिनी मॉडेल मर्सा मटरूहमध्ये फिरण्यासाठी आली होती. मटरूह हे पर्यटकांना आकर्षक करणारे ठिकाणं आहे. दररोज इथे शेकडो पर्यटक भेट देत असतात. भल्यामोठ्या लाटा अन् उतंग समुद्रकिनारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. चिनी मॉडेलही याच ठिकाणी भेट देण्यासाठी आली होती. फोटोसाठी ती समुद्रातील एका खडकावर पोझ देत होती. पण भरती अहोटीच्या वेळी लाटा तिथल्या खडकावर आदळतात. त्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण होते. त्यामुळे सावधानतेचा इशारा दिला जातो. पण चिनी मॉडेलने याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी लाट आली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. लाटेने चिनी मॉडेलला खडकावर जोरात आदळले.

चिनी मॉडेल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या खडकावर नारंगी रंगाचा ड्रेसमध्ये पोझ देताना व्हिडिओत दिसत आहे. त्याचवेळी अचानक समुद्राच्या उसळत्या लाटा मॉडेलकडे आल्या. त्या लाटेच्या धडकेने मॉडेल समुद्रात कोसळली. या दुर्घटनेतून ती वाचली पण तिला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. ती सुरक्षा दोरी पकडून किनार्‍यावर परतण्यात यशस्वी झाली. सध्या त्या मॉडेलवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death Facts: मृत्यूनंतरही 'हा' अवयव असतो जिवंत; जाणून आश्चर्य वाटेल

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीने दिली पुणे महापालिकेची जबाबदारी

Maharashtra Politics: मुंबईत दोस्ती तर पुण्यात कुस्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून ठाकरे गटाने थोपटले दंड

Homemade Date Chutney: आंबटगोड खजूर चटणीची परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या झटपट पटापट

Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

SCROLL FOR NEXT