Delhi Viral VIdeo  Saamtv
देश विदेश

Viral Video: संतापजनक! भररस्त्यात तरुणीला बेदम मारहाण; व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप

Delhi News: या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणीला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून तिला मारहाण केल्याचे दिसत आहे..

Gangappa Pujari

Delhi Viral Video: देशात महिला अत्याचाराच्या आणि मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शुल्लक कारणांवरुन महिलांवर हात उचलले जात असल्याच्या घटना समोर घडत आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणानेही देशभरात अशीच खळबळ माजली होती.

या हत्यने राजधानी दिल्लीमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता पुन्हा एकदा दिल्लीमधील एका तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीच्या मंगोलपुरी फ्लायओव्हरचा एक व्हिडिओ धक्कादायक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करताना दिसत आहे. त्या व्यक्तीने महिलेला कारच्या आत ढकलल्यानंतर तिला मारहाण केली आणि नंतर समोरच्या सीटवर बसला तर काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दुसरा पुरुष कारमध्ये येऊन महिलेच्या शेजारी बसला.

या व्हायरल व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजली असून नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरूवात केली आहे. ज्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुग्रामच्या रतन विहारमध्ये राहणार्‍या दीपकच्या नावावर ही कार नोंदणीकृत आहे आणि दीपकने ती एका फायनान्सरला विकली होती.

आतापर्यंत हे वाहन सुमारे ५०० जणांना विकले गेले आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेत संतापले असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी होत आहे. दरम्यान, काल नागपूरमध्येही अशाच प्रकारे भररस्त्यात महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत राज्यात महिला सुरक्षित आहेत का असा संतप्त सवाल या व्हिडिओवर उपस्थित केला होता. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर नाशिमधल्या कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT