Farmer Viral Video Saamtv
देश विदेश

Farmer Viral Video: शेतकऱ्याचा नादचं खुळा! गहू कापणीसाठी केला असा जबरदस्त जुगाड, मिनिटांमध्ये होईल काम, VIDEO तुफान VIRAL

Farming Jugad Viral Video: या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे....

Gangappa Pujari

Farmer Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) शेतकऱ्यांसंबंधीचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी शेतीविषयक माहिती, तर कधी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेले नवनवे प्रयोगांची या व्हिडिओमधून माहिती दिली जाते. बऱ्याचदा हे व्हिडिओ शेतकऱ्याने केलेल्या भन्नाट जुगाडाचेही असतात, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने गव्हाचे पीक कापण्यासाठी असा काही जुगाड केला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काय आहे या व्हायरल व्हिडिओची (Viral Video) कथा, चला जाणून घेवू....

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीमध्येही (Agriculture) प्रचंड बदल झाले आहेत. सध्या शेतीतील काम करण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रांचा उपयोग केला जातो. शेतीच्या कामासाठी वेगळ्या प्रकारची यंत्र तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची काम सोपे होते आणि वेळेचीही बचत होण्यास मदत होते.

पण अनेकदा काही शेतकऱ्यांजवळ आपल्या शेतात मशीन आणण्यासाठीचे पैसे नसतात तर कधी त्यांच्या शेतापर्यंत मशीन येऊ शकत नाही. अशावेळी शेतकऱ्यांची आयडियाची कल्पना कामाला येते. व्हायरल व्हिडिओमधील शेतकऱ्यानेही असाच भन्नाट जुगाड केला आहे. ज्यामुळे गव्हाचे पीक अवघ्या काही सेकंदात काढता येईल.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक शेतकरी यामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करताना आणि एका खास मशीनचा वापर करून काही क्षणात गहू काढताना दिसत आहे. त्यामुळे तो वेळेसह पैशाचीही बचत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या शेतकऱ्याच्या जुगाडाचा व्हिडीओ जुना असला तरी तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत तो एक मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून शेतकऱ्याच्या टॅलेंटचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT