देश विदेश

बाबो! टॅक्सीचं बिल पाहून प्रवाशी चकीत; बिल एवढं की नवी BMW येईल

प्रवास केवळ १५ मिनिटांचा होता. हे प्रकरण इंग्लंडमधील मँचेस्टरचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मॅन्चेस्टर : तुम्ही देखील ऑनलाइन बुकिंगद्वारे कॅब बुक करून प्रवास करत असाल तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. उबेर कॅबमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीकडून ६.४ किमीच्या प्रवासासाठी ३२ लाख रुपये भाडे आले आहे. हा प्रवास केवळ १५ मिनिटांचा होता. हे प्रकरण इंग्लंडमधील मँचेस्टरचे आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑलिव्हर कॅप्लन नावाच्या 22 वर्षीय तरुणाने ग्रेटर मँचेस्टरमधील हाईट ते अॅश्टन-अंडर-लिनपर्यंत उबेर कॅब बुक केली. प्रवास सुरू होण्यापूर्वी त्याला सुमारे ९२१ रुपये कोट देण्यात आले होते, मात्र जेव्हा त्याने प्रवास संपवला तेव्हा बिल पाहून त्याच्या डोकं हँग झालं.

कंपनीच्या वतीने त्याच्याकडे ९२१ नव्हे तर ३२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तरुणाने सकाळी उठून मोबाईल पाहिला असता त्यात उबेरकडून सुमारे ३२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. हे पैसे डेबिट कार्डने जमा करायचे होते.

डेली मेलने ऑलिव्हर मार्फत दिलेल्या वृत्तात म्हटलं की, मी उबेर कॅब बूक केली होती. रात्रीच्या वेळी मी साधारण 15 मिनिटांचा प्रवास केला. बुकिंगच्या वेळी भाडे 10-11 पाऊंड म्हणजे जवळपास 1000 रुपये दाखवण्यात आले होते. जे माझ्या डेबिट कार्डवरून आकारले जाणार होते.

ऑलिव्हरने पुढे सांगितले की, मी घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा मला उबेरकडून बिलाचा मेसेज आला. ज्यामध्ये 35,000 पाऊंड्सपेक्षा जास्त रकमेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर भाडे किती आहे हे जाणून घेण्यासाठी मी कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. तेथील कर्मचाऱ्यांनाही आधी आश्चर्य वाटले, पण नंतर परिस्थिती समजली.

तपासणीदरम्यान, कंपनीला असे आढळून आले की ऑलिव्हरने ड्रॉपिंगसाठी नाव दिलेले ठिकाण अॅडलेड, ऑस्ट्रेलियाजवळ आहे. ज्यांचे अंतर मँचेस्टर शहरापासून सुमारे 16000 किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर उबरने ऑलिव्हरकडून 10.73 पाऊंड भाडे आकारले. याबाबत उबरने म्हटले आहे की, ऑलिव्हरच्या तक्रारीनंतर कंपनीने लगेच चूक सुधारली. गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगीरीही व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT