Madeleine Jaye Saam Tv
देश विदेश

Viral News: गर्लफ्रेंडसोबत एन्जॉय करत होता हॉलिडे, तेवढ्यात पहिली प्रेग्नेंट प्रेयसी आली समोर; पुढे जे घडलं ते जाणून व्हाल थक्क

Latest Viral News : गर्लफ्रेंडसोबत एन्जॉय करत होता हॉलिडे, तेवढ्यात प्रेग्नेंट प्रेयसी आली समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Love Story: अलीकडेच डेटिंग अॅपची क्रेज खूपच वाढताना दिसत आहे. अनेकजण आजच्या काळात डेटिंग अॅपचा वापर करून नवीन व्यक्तींना भेटतात. यात काहींचं नातं लग्नापर्यंत पोहोचतं, तर काहींचं जुळण्याआधीच तुटतं. मात्र काहींची गोष्ट या पलीकडचीही असते.

अशाच एका 22 वर्षीय मुलीला तिचा स्वप्नातील राजकुमार एका डेटिंग अॅपवर भेटला. त्यासोबत काही दिवस नात्यात राहिल्यावर ती लग्नाची स्वप्न देखील पाहायला लागली होती. मात्र तिच्यासोबत जे घडलं, ते जाणून तुम्हालाही धक्का बसेल. या मुलीने तिच्यासोबत जे घडलं, ते स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, ही मुलगी शेफिल्ड, यूकेची (UK News) आहे. तिचे नाव मॅडेलीन जे (Madeleine Jaye). काही काळापूर्वी ती जेन नावाच्या एका मुलाशी डेटिंग अॅप टिंडरवर (Dating App Tinder) भेटली. काही दिवस चॅट केल्यानंतर दोघांनी भेटण्याचं ठरवलं. काही वेळा भेटल्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. आपले नाते पुढे नेण्यासाठी त्यांनी स्पेनला रोमँटिक हॉलिडेवर जाण्याचा निर्णय घेतला.  (Latest Marathi News)

पण हे दोघेही हॉलिडे एन्जॉय करत असतानाच मॅडेलीनचा बॉयफ्रेंड जेनचं एक मोठं गुपित उघड (Viral Love Story) झालं. जेन यांची आधीच एक प्रेयसी असून ती गर्भवती असल्याचं समोर आलं. बॉयफ्रेंडबद्दल इतकं मोठं सत्य कळल्यानंतर मॅडेलीनला मोठा धक्का बसला...

Latest Viral News : कसं समोर आलं सत्य?

तीन महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर मॅडलीन जेसनसोबत व्हेकेशनसाठी स्पेनला गेली होती. विमानतळावर उतरताच एका गर्भवती महिलेने त्यांना थांबलं. तिने सांगितले की, ती जैनची प्रेयसी आहे आणि ती त्याच्या मुलाची आई होणार आहे. हे ऐकून मॅडलीनला (Viral Love Story) धक्काच बसला.

जेन याने आपले नाव बदलून चार वेगवेगळ्या मुलींना डेट केल्याचा दावाही महिलेने केला आहे. जेन हा फ्रॉड असून त्याला दोन मुलंही असल्याचं महिलेनं सांगितलं. यादरम्यान विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झालं (Latest Viral News) होतं.

दरम्यान, जेन याचं सत्य कळाल्यानंतर मॅडलीनने डेटिंग अॅपला रामराम ठोकला आहे. ती म्हणाली आहे की, ज्याला मी माझ्या स्वप्नाचा राजकुमार समजत होती, तो फ्रॉड (Latest Viral News) निघाला. हा खूपच दुःखद अनुभव होता. आता कोणत्याही पुरुषावर मी भविष्यात विश्वस ठेवू शकणार नाही. जेनने माझ्या भावनांशी खेळ केला आहे. माझा गैरफायदा घेत प्रेमाच्या नावाखाली फसवणूक (Viral Love Story) केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 Astrology: नोकरीत बढती अन् आर्थिक चणचण होणार दूर; या ४ राशींचे व्यक्ती मालामाल

Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

SCROLL FOR NEXT