girl dance video viral  Saam tv
देश विदेश

Viral Video : 'टिप टिप बरसा पानी...' ; चिंब पावसात तरुणीने लगावले जबरदस्त ठुमके, व्हिडिओ पाहून म्हणाल...

Girl Dance Video: 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Latest Viral Video : सध्या सोशल मीडियावर डान्सर गौतमी पाटीलच्या डान्सच्या तुफान चर्चा आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणमंडळी झाडून उपस्थित राहत आहेत. गौतमीच्या डान्सचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. याचदरम्यान, 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तरुणीच्या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीत तरुणीने 'मोहरा' या सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावले आहेत. या व्हायरल व्हिडिओमधील (Viral Video) बोल्ड अंदाज कोणत्याही नेटकऱ्यांना सहज भुरळ पाडणारा आहे. या तरुणीने मनमोहक डान्स करण्याबरोबर गाणं देखील बोलताना दिसत आहे. चिंब पावसात केलेल्या नृत्याची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे.

तरुणीचा बोल्ड डान्स नेटकरी प्रचंड शेअर करत असून प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहे. तरुणीचे जबरदस्त ठुमक्यांवर नेटकरी फिदा झाले आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ एकदा पाहल्यानंतर वारंवार पाहाल. डान्स करताना तरुणीची अदा पाहण्यासारखी आहे.

तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तरुणीचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओ प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, 'खूप भारी डान्स केला आहे, वर्षभरातील सर्वात्कृष्ट डान्स आहे' तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, 'माझ्या हृदयात आग लावली आहे'. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, खूप मस्त डान्स केला आहे. या तरुणीने कमालीचा डान्स केला आहे. डान्स पाहून भारी वाटतंय'. दरम्यान, या व्हायरल तरुणीचा डान्स पाहून अनेकांनी 'मोहरा' सिनेमातील अभिनेत्री रवीना टंडनची आठवण काढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT