5 STATE ASSEMBLY ELECTIONS 2027 saam tv
देश विदेश

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

UP, Punjab, Goa Elections 2027: उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यांचा दौरा करण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांच्या तयारीला वेग देण्यात आला असून, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबर पहिल्या आठडवड्यात आयोगाचे पथक संबंधित राज्यांचा दौरा करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाऊ शकते. जानेवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखली जात आहे. दरम्यान निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनही तयारी केली जात आहे. निवडणूक आयोगाचे पथक प्रत्येक राज्यात साधारण दोन दिवसांचा दौरा करू शकते. या दौऱ्यात निवडणूक व्यवस्थेशी संबंधित अधिकारी आणि इतर महत्वाच्या घटकांसोबत बैठका घेतल्या जाणार आहेत. या बैठकांमध्ये निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

उत्तर प्रदेश वगळता उर्वरित चार राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्च 2027 पर्यंत संपणार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. तर उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 22 मे 2027 पर्यंत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालाडमधील छटपूजेच्या आयोजनावरून मनसेचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

SCROLL FOR NEXT