काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रदेश संघटनेच्या नेतृत्वात मोठे बदल केले आहेत.
आराधना मिश्रा ‘मोना’ यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इमरान मसूद यांना उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं तयारीला लागली आहे. निवडणुकांमध्ये भाजपचा दारूण पराभव करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली असून पक्षात मोठे बदल करण्यात येत आहेत. प्रभारी बदलल्यानंतर आता दोन राज्यातील पक्ष संघटनेत मोठी उलटफेर करण्यात आलीय. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये अध्यक्ष बदलण्यात आलेत.
उत्तर प्रदेशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या राज्य संघटनेत मोठा बदल करत आराधना मिश्रा 'मोना' यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंग राजा वडिंग यांच्या राजीनाम्यानंतर, परगट सिंग यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आलीय.
पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंग 'राजा वडिंग' यांच्यानंतर, परगत सिंग यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आलीय. हॉकीचे माजी कर्णधार आणि ऑलिंपियन असलेले परगत सिंग हे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी चन्नी यांच्यासोबत मिळून राजा वडिंग यांच्या विरोधात मोहीम चालवली होती; आता चन्नी यांच्या शिफारशीवरून राहुल गांधी यांनी पंजाब काँग्रेसची धुरा परगत सिंग यांच्याकडे सोपवली आहे.
राजा वडिंग २०२२ पासून पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे नेतृत्व करत होते. मात्र, नेतृत्वाबाबतच्या अलीकडील अंतर्गत चर्चा आणि पक्षात गटबाजीची चर्चा सुरू असताना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या निवेदनाद्वारे परगट सिंग यांची पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्ती जाहीर करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने राज्यात संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल करत आराधना मिश्रा 'मोना' यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय. त्यांनी अजय राय यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तसेच, संघटना बळकट करण्यासाठी देवेंद्र निषाद आणि आलोक प्रसाद यांच्यावर वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मिश्रा या प्रतापगडमधील रामपूर खास विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आहेत. त्या ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांच्या कन्या आहेत. इम्रान मसूद हे सहारनपूरचे लोकसभा खासदार आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील या बदलाकडे २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.