PM Modi Saam Tv
देश विदेश

Vibrant Gujarat Global Summit: PM मोदी आणि यूएईच्या राष्ट्राध्यक्षांचा अहमदाबादेत रोड शो

Bharat Jadhav

Vibrant Gujarat Global Summit:

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील मैत्रीची झलक व्हायब्रंट गुजरात समिट दरम्यान पाहायला मिळेल. या समिटच्या उद्घाटनासाठी संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) राष्ट्राध्यक्षांचा रोड शो होणार आहे. अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदी स्वतः यूएई राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर विमानतळ ते गांधी आश्रमापर्यंत दोन्ही नेत्यांचा रोड शो होणार आहे. (Latest News)

दरम्यान व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भारतातील ही चौथी भेट असेल. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे नरेंद्र मोदींना आपला मोठा भाऊ मानतात. नरेंद्र मोदींनीही आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत सहावेळा यूएईला भेट दिलीय. मोदी पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा अबुधाबी येथील मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी जाणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन्ही देशांमध्ये सुमारे ८५ अब्ज डॉलर्सचा व्यापार

भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या नेत्यांमधील या चांगल्या संबंधाचा फायदा दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्यास झालाय. UAE हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून सध्या दोन्ही देशांमध्ये सुमारे ८५ अब्ज डॉलर्सचा व्यापार झालाय. या दोन्ही देशाचे पाच वर्षात पेट्रोलियम उत्पादनांचा व्यापार शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT