PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Tv
देश विदेश

महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह दिग्ग्ज नेत्यांनी दिल्या शुभेच्छा!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त राज्यभरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठीमध्ये ट्वीट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह दिग्ग्ज नेत्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत ते म्हणाले की, राज्य स्थापना दिवस पर महाराष्ट्र के सभी लोगों को बधाई। छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले व बाबासाहब जैसी महान विभूतियों ने महाराष्ट्र व भारत को अपने योगदान से समृद्ध किया है। राष्ट्र के आर्थिक विकास में महाराष्ट्र का अहम योगदान है। मैं राज्य के उज्ज्वल भविष्य की कामना करता हूं.

केंद्रीय मंत्री अमित शाह ट्विट करत म्हणाले की, देशाला स्वराज्य, सुशासन, सामाजिक न्याय आणि लोकशाहीचा संदेश देणाऱ्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या वीरभूमी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.मी महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Loksabha: बारामतीनंतर शिरुरमध्येही अपक्षाच्या हाती 'तुतारी'; अमोल कोल्हेंची वाढणार चिंता?

OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

Today's Marathi News Live : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा.

Kenya Dam Burst : केनियामध्ये मोठी दुर्घटना; धरण फुटल्याने ३५ जणांचा मृत्यू, रात्री गाढ झोपेतच नागरिक वाहून गेले

IMD Report: देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता; वाचा IMD रिपोर्ट

SCROLL FOR NEXT