Varanasi Viral News : उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील भाजी विक्रेत्याने त्याच्या आणि टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाउन्सर ठेवले. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसतोय. विक्रेत्यांना संतप्त ग्राहकांकडून मारहाण होण्याचा धोका आहे. त्यामुळे वाराणसीतील एका पठ्ठ्यानं बाऊन्सर नेमले आहेत.
उत्तर प्रदेशात टोमॅटोचा भाव 150 रुपयांच्या पुढे आहे. टोमॅटो वाढलेले दर अनेकांच्या आवाक्याबाहेर आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने त्याची चोरीही होऊ शकते.
वाराणसीचे टोमॅटो (Tomato) विक्रेते अजय फौजी यांनी म्हटलं की, ग्राहकांनी टोमॅटो जवळ येऊ नये म्हणून बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव खूप वाढले असल्याने त्याची सुरक्षा करावी लागत आहे.
ग्राहक वाद घालत आहेत आणि टोमॅटो देखील लुटत आहेत. आमच्या दुकानात टोमॅटो असल्याने वाद नको म्हणून येथे बाऊन्सर ठेवले आहेत, असं फौजी यांनी सांगितलं. (Tajya Batmya)
मध्य प्रदेशात स्मार्टफोन घेतल्यास मोबाईल फ्री
मध्य प्रदेशमध्ये मोबाईल दुकान मालाकाने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची ऑफर काढली आहे. शहरात टोमॅटोचे भाव 160 रुपयांच्या पुढे गेले आहेत. टोमॅटोचे वाढलेले भाव पाहून दुकानदाराने स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना टोमॅटो देण्याचा निर्णय घेतला. या ऑफरमुळे ग्राहकांची संख्या वाढल्याचंही दुकान मालकानं सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.