Uttarpradesh Saharanpur Horror Crime Saam Tv News
देश विदेश

Shocking: संतापजनक! गायीवर नराधमाचे दुष्कृत्य, VIDEO व्हायरल होताच आरोपीला अटक; गोळीबारात आरोपी जखमी

Viral Video Exposes Cow Abuse: सहारनपूरमध्ये गायीवर दुष्कृत्य करणारा राम बहादूर पोलिसांशी झटापटीनंतर गोळीबारात जखमी. आरोपीकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांत संतापाची लाट.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने गायीवर दुष्कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीचा शोध घेतला, मात्र त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो पायाला गोळी लागून जखमी झाला आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

राम बहादूर असे आरोपीचे नाव आहे. तो सदर पोलीस स्टेशन परिसरातील नवादा रोड येथील रहिवासी आहे. त्यानं सहारनपूरमध्ये गायीसोबत घृणास्पद कृत्य केलं. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर राम बहादूर एका गायीसोबत दुष्कृत्य करत असल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच, आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होऊ लागली.

पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात झाली. तपासात आरोपीचे नाव राम बहादूर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो नवादा रोड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला. आरोपीने पोलिसांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत राम बहादूरवर गोळीबार केला. गोळीबारादरम्यान, त्याच्या पायात गोळी लागली. यामुळे तो गंभीर जखमी झाला. रक्त वाहू लागल्यानं तो जमिनीवर कोसळला. पोलिसांनी राम बहादूरला अटक केली असून, त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास करून आरोपीकडून पिस्तूल आणि काडतुसेही जप्त केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Makhana Smoothie Recipe: वजन होईल कमी झटक्यात कमी; पौष्टीक मखाना-फ्रूट प्रोटीन स्मूदीची वाचा सोपी रेसिपी

Carrot Gulab Jamun : गाजराचा हलवा नेहमी खाल्ला आहे, पण कधी गाजर गुलाब जाम ट्राय केलेत? वाचा सोपी रेसिपी

Pudachi Vadi: विदर्भातली प्रसिद्ध पुडाची वडी कशी बनवायची?

Black Hair Colour Tips: पांढरे केस काळे करण्यासाठी काय करायचं?

SCROLL FOR NEXT