Uttarkashi Accident Saam TV
देश विदेश

Uttarkashi Accident: देवदर्शनाहून घरी परतताना काळाचा घाला! ३५ प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली, ७ भाविकांचा मृत्यू

Uttarkashi Accident 7 Devotees Killed: गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगानानीजवळ दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

Ruchika Jadhav

Uttarakhand Devotees Bus Accident:

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. उत्तरकाशीच्या गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानी जवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. ३५ प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळीये. यामध्ये ७ मृत्यू आणि २७ प्रवाशी गंभीर जखमी आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुजरातचे रहिवासी असेले ३५ प्रवाशी देवदर्शनासाठी उत्तरकाशीमध्ये आले होते. गंगोत्रीहून ते घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगानानीजवळ दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

प्रवाशांनी भरलेल्या बसचा उच्चरकाशीच्या गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. अपघातामध्ये ७ भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर २७ प्रवाशी गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उत्तराखंडमध्ये झालेल्या या अपघाताने भावीकांमध्ये दु:खाचं वातावरण पसरलंय. देवदर्शन घेऊन घरी परतत असताना वाटेतच असं काही होईल याची कुणालाच काही कल्पना नव्हती. या घटनेनं देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT