Uttarakhand Tunnel Accident Update Saam Digital
देश विदेश

Uttarkashi Tunnel Update: ''देवाने ऐकलं..माझा मुलगा बाहेर येतोय''.. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगाराची आई झाली भावुक

Uttarkashi Tunnel Update: उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांमध्ये उत्तर प्रदेशमध मिर्झापूरच्या अखिलेश कुमारचाही समावेश आहे. १६ दिवसांपासून ते बोगद्यात मृत्यूशी झुंज देत आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttarkashi Tunnel Update

उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांमध्ये उत्तर प्रदेशमध मिर्झापूरच्या अखिलेश कुमारचाही समावेश आहे. १६ दिवसांपासून ते बोगद्यात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घरी पहिल्या दिवसांपासून देव पाण्यात ठेवून पार्थना सुरू आहे. यादरम्यान सायंकाळपर्यंत कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात येणार असल्याची बातमी आली आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांची आई भावुक झाली.

मृ्त्यूच्या तावडीतून सुटून मुलगा बाहेर येत असल्याचा अखिलेश यांच्या आईला झालेला आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. सकाळीच फोनवर मुलासोबत बोलणं झालं होतं. आज माझा मुलगा बाहेर येत आहे, याच्या पेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काय अशू शकते. सकाळपासून घरातील सर्वजण टीव्ही समोर बसले आहेत. ज्यावेळे पासून अखिलेश बोगद्यात अडकल्याची बातमी आली, तेंव्हापासून घरात पूजा-प्रार्थना सुरू आहे, असं अखिलेशची आई अंजू देवी सांगते.

अंजू देवी पुढे सांगतात, सकाळीच त्याच्या सोबत फोनवर बोलंण झालं होतं, त्यावेळी अखिलेशने मला आई तु रडत तर नाहीस ना, असं विचारलं. मी म्हणाले, माझा मुलगा सुखरूप बाहेर येत असताना का बरं रडायचं आणि आज देवानं माझं ऐकलं. माझा मुलगा खरोखरचं बाहेर येत आहेत. असं सागतं असताना त्या भावुक झाल्या. त्यांचे डोळे भरून आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखिलेशचे वडील म्हणाले, आमचा मुलगा बाहेर येत आहे , आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण गाव आनंदी आहे. फटाक्यांची आतिशबाजी करणार आहोत. गावात दिवाळी साजरी होणार आहे. मागचे १६ दिवस खूपच वाईट गेले. प्रत्येक क्षण अखिलेशच्या बाहेर येण्याची वाट पाहात होतो. आज देवाने आमची इच्छा पूर्ण केली. आम्हाला झालेला आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT