Uttarakhand Tunnel Accident Update Saam Digital
देश विदेश

Uttarakhand Tunnel Accident Update: उत्तरकाशी बचावकार्यात पुन्हा अडचणी, १४ दिवसांपासून सुरू आहे मोहीम

Uttarakhand Tunnel Accident Update: उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे काम गेल्या १४ दिवसांपासून अविरत सुरू आहे. मात्र बचावकार्यात पदोपदी अडथळे निर्माण होत असल्यामुळे अद्याप कामगारांपर्यंत पोहोचता आलेलं नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttarakhand Tunnel Accident Update

उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे काम गेल्या १४ दिवसांपासून अविरत सुरू आहे. मात्र बचावकार्यात पदोपदी अडथळे निर्माण होत असल्यामुळे अद्याप कामगारांपर्यंत पोहोचता आलेलं नाही. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी सिल्क ११ बोगद्यात ड्रिलिंगदरम्यान मशीनचे ब्लेड लोखंडी सळ्यांच्या जाळ्यात अडकून पडले, त्यामुळे ऑगर मशीनद्वारे काम करणे मुश्किल बनले असून शुक्रवारी सायंकाळी पुन्हा बचाव मोहीम थांबवण्यात आली.

शुक्रवारी सायंकाळी ड्रिलिंगदरम्यान लोखंडी सळ्याचं जाळं मशीनसमोर आलं, त्यामुळे ऑगर मशीनचे ब्लेड या सळ्य़ांच्या जाळ्यात अडकले. मशीनचा समोरिल भाग लोखंडी पाईपमध्ये अडकून पडला. बचाव मोहीम सुरू झाल्यापासून या मशीनला आलेली ही आतार्यंतची सर्वात मोठी अडचण आहे. लोखंडी सळ्यांच्या जाळ्यात अडकलेले ब्लेड काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मशीन बाहेर काढण्यासाठी लोखंडी जाळं कापल्याशिवाय बचाव पथकांसमोर कोणताही दुसरा मार्ग नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोखंडी पाईप दरडीखालून घालण्याची क्षमता मशीनमध्ये आहे मात्र, लोखंडी सळ्या मार्गात आल्यामुळे हा पर्यायही आता बंद झाला आहे. काही वेळानंतर मोठी बैठक होणार असून या बैठकीत व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक़्यता आहे. दरम्यान ओएनजीसी, एसजीव्हीएनएल व्हर्टिकल ड्रिलिंग करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी लागणाऱ्या मशीन जोडण्यात आल्या आहेत. ट्रकची मजबुती तपासल्यानंतर साहित्य ड्रिलिंगच्या ठिकाणी पोहोचवलं जाईल. सध्या यासंदर्भात बैठक सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chinese Bhel Recipe: फक्त ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल चायनीज भेळ, रेसिपी लगेच करा नोट

Maharashtra News Live Update: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; मुदतवाढ उद्यावर; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका

Marriage Rules: भावी वर-वधूसाठी महत्वाची बातमी; लग्नपत्रिकेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

School Timing Change: मोठी बातमी! शाळेच्या वेळेत बदल; जिल्हाधाऱ्यांकडून शाळांना कडक आदेश

SCROLL FOR NEXT